Drought Conditions: बुलडाणा जिल्ह्यात आगामी रब्बी हंगामासाठी कृषी विभागाने तीन लाख ८७ हजार ९२० हेक्टर क्षेत्रावर पेरणीचे नियोजन केले आहे. मात्र, यंदा कमी पर्जन्यमानामुळे निर्माण झालेली दुष्काळी परिस्थिती आणि जमिनीतील ओलाव्याची कमतरता पाहता या नियोजनानुसार प्रत्यक्ष पेरणी होण्याबाबत साशंकता आहे. आगामी काळात होणारा पाऊस आणि सिंचनासाठी उपलब्ध असलेले पाणी यावर रब्बी हंगामातील पेरणीचे क्षेत्र अवलंबून राहणार आहे..जिल्ह्यात मागील वर्षी तीन लाख ८६ हजार ५१६.२० हेक्टर क्षेत्रावर रब्बी पिकांची पेरणी झाली होती. त्या तुलनेत यंदा कृषी विभागाने तीन लाख ८७ हजार ९२० हेक्टर क्षेत्राचे नियोजन केले आहे. मात्र, नियोजित क्षेत्र आणि प्रत्यक्ष पेरणी होणारे क्षेत्र यामध्ये फरक पडण्याची शक्यता आहे..Rabi Season : पाच लाख ५४ हजार हेक्टरवर रब्बीत पेरणीचे कृषी विभागाकडून नियोजन.कृषी विभागाच्या नियोजनानुसार, यंदा जिल्ह्यात दोन लाख ९० हजार हेक्टरवर हरभरा, ५५ हजार हेक्टरवर गहू, २७ हजार ५०० हेक्टरवर मका आणि १२ हजार ५०० हेक्टरवर ज्वारीची पेरणी प्रस्तावित आहे. याशिवाय करडई ५६० हेक्टर, सूर्यफूल ६० हेक्टर आणि इतर पिकांसाठी दोन हजार ३०० हेक्टर क्षेत्राचे नियोजन करण्यात आले आहे..Rabi Irrigation: खडकवासला धरणातून रब्बीचे आवर्तन सुरू.यंदाच्या नियोजनात हरभऱ्याच्या क्षेत्रात मागील वर्षाच्या तुलनेत ५० हजार ३९० हेक्टरने वाढ करण्यात आली आहे. दुसरीकडे, गहू आणि मक्याच्या क्षेत्रात घट होण्याची चिन्हे आहेत. हरभरा हे रब्बी हंगामातील प्रमुख पीक असल्याने त्याच्या क्षेत्रवाढीचे उद्दिष्ट ठेवण्यात आले आहे. दरम्यान, सध्या जिल्ह्यात दुष्काळी परिस्थिती असल्याने रब्बी पिकांच्या पेरणीसाठी पुरेसा ओलावा आणि सिंचनाची उपलब्धता महत्त्वाची ठरणार आहे. दरवर्षी दसरा ते दिवाळीच्या कालावधीत होणाऱ्या पावसामुळे काही भागांत पेरणीसाठी अनुकूल परिस्थिती निर्माण होते. यंदाही या काळात पाऊस झाल्यास पेरणीला मदत होऊ शकते..कृषी विभागाने रब्बीतील लागवडीचे पीकनिहाय नियोजन केले आहे. मात्र, पाऊस पडला नाही तर रब्बी क्षेत्रामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये घट येण्याची दाट शक्यता आहे. त्यामुळे शेतकऱ्यांनी त्यांच्याकडे असलेली संरक्षित ओलिताची व्यवस्था व जमिनीमधील ओलावा यांचे नियोजन करूनच पेरणी करावी. पेरणी करताना कमी कालावधीची व कमी पाण्यात येणारी हरभरा, रब्बी ज्वारी, करडई, जवस, मोहरी यासारखी पिके घ्यावीत.- संतोष डाबरे, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी, बुलडाणा.ॲग्रोवनचे सदस्य व्हाशॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.