
ब्रोकोली आहारात घेतल्याने होणारे आरोग्यावरील फायदे सर्वांना माहिती आहेत. मात्र पचन संस्थेच्या दृष्टीने त्याला खऱ्या अर्थाने ‘सुपर फूड’ म्हणता येईल, असा दावा पेन्नसिल्वनिया राज्य विद्यापीठातील संशोधकांनी केला आहे. त्यांनी उंदरावर केलेल्या संशोधनामध्ये ब्रोकोली या कोबीवर्गीय भाजीचे अनेक फायदे समोर आले आहेत.
या भाजीच्या नियमित आहारातील समावेशामुळे टाइप २ प्रकारच्या मधुमेह आणि कर्करोगाचा धोका कमी होतो. त्याच प्रमाणे यातील काही रसायने ही एका विशिष्ट प्रकारच्या रिसेप्टरला बांधून ठेवते. त्यामुळे लहान आतड्यातील अंतःत्वचेचा थर चांगला ठेवण्यामध्ये ते मोलाची भूमिका निभावते. संशोधनाचे निष्कर्ष ‘जर्नल लॅबोरेटरी इन्व्हेस्टिगेशन’ मध्ये प्रकाशित करण्यात आले आहेत.
या संशोधनाविषयी माहिती देताना गॅरी परड्यू, एच. थॉमस आणि डोरोथी विल्लिट हॅल्लोवेल यांनी सांगितले, की आपल्यापैकी बहुतेक सर्वांना ब्रोकोली पिकांच्या आरोग्यासाठीचे फायदे माहिती आहेत.
मात्र ते कशा प्रकारे व का उपयोगी ठरते, याविषयी फारच कमी माहिती उपलब्ध नव्हती. ही सारी यंत्रणा शोधण्याचे काम आमच्या संशोधनात केले गेले. कोबीवर्गीय पिकांमध्ये ब्रोकोली, कोबी आणि ब्रुसेल्स स्प्राऊट या साऱ्या भाज्यांचा समावेश होतो.
या भाज्या लहान आतड्याच्या अंतःत्वचेच्या आरोग्यासाठी महत्त्वाच्या आहे. ही त्वचा विशेषतः त्यातील एन्टेकोसायट्स पेशी या खाल्लेल्या अन्नातील पोषक घटक आणि पाणी यांचे शोषण करून उर्वरित शरीराला पोहोचविण्याचे काम करतात. त्याच वेळी शरीराला हानिकारक ठरू शकेल, असा कोणताही घटक किंवा जिवाणूला रोखण्याचे काम ग्लोबेट पेशी करतात.
या ग्लोबेट पेशी आतड्याच्या आतील बाजूने एक म्युकसचा संरक्षणात्मक थर तयार करतात. आणखी एक प्रकारच्या पेशी (पॅनेथ पेशी) या लोयसोसोम्स हे एक प्रकारचे पाचक विकर तयार करतात. या तिन्ही पेशींच्या संतुलित कार्यामुळेच पचनाचे काम चांगल्या प्रकारे होऊन आरोग्याची स्थिती प्राप्त होण्यास मदत होते.
गॅरी परड्यू व त्यांच्या सहकाऱ्यांनी या कामामध्ये महत्त्वाची भूमिका निभावणारे ब्रोकोली मूलद्रव्य शोधले आहे. त्याला ‘अरिल हायड्रोकार्बन रिसेप्टर (एएचआर)’ असे म्हणतात.
चाचण्या
संशोधकांनी उंदराच्या एका गटाला त्याच्या आहाराच्या १५ टक्के इतक्या प्रमाणात ब्रोकोली दिली. (मानवी आहारासाठी हे प्रमाणात ३.५ कप इतके होते.). दुसऱ्या एका नियंत्रित गटाला ब्रोकोली नसलेला आहार देण्यात आला.
त्यानंतर केलेल्या तपासण्यांमध्ये त्यांच्या स्नायूमध्ये कार्यान्वित होणाऱ्या एएचआर घटकांचे प्रमाण मोजण्यात आले. त्याच प्रमाणे वेगवेगळ्या प्रकारच्या पेशींमध्ये आणि त्यांनी तयार केलेल्या म्युकस तीव्रता अशा अन्य घटकांची मोजणी करण्यात आली.
ज्या गटाला ब्रोकोली देण्यात आलेली नव्हती, त्या गटांमध्ये एएचआर कार्यान्वित झाले नव्हते. त्यामुळे आतड्याच्या कार्यामध्ये काही बाधा निर्माण झाल्या होत्या. त्यामुळे अन्नातील पोषक घटकांचे शोषण करण्याचा कालावधी वाढला होता. त्याच प्रमाणे ग्लोबेट पेशींची संख्या व संरक्षणत्मक म्युकस थर कमी झाला.
पेनेथ पेशींची संख्या कमी होऊन लायसोसोमचे उत्पादन कमी झाले. तसेचस एन्टेरोसायट्स पेशींची संख्याही कमी झाली. हे सारे घटक वेगवेगळ्या रोगांची जोडली जाऊन त्यांना चालना मिळते.
परड्यू म्हणाले, की ब्रोकोलीचा आहारात समावेश नसलेल्या उंदरांमध्ये पचनसंस्थेचे आरोग्य वेगवेगळ्या प्रकारे बाधित होते. एएचआर घटकाचे प्रमाण वाढविणाऱ्या आहारामध्ये ब्रोकोलीचा समावेश होतो. हे कशा प्रकारे घडते, ही बाब स्पष्ट झाली आहे.
Read the latest agriculture news in Marathi and watch Agriculture videos on Agrowon. Get the latest updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Agriculture Jugad, and Farmer Success Stories.
ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.