Small Business Crisis: अलिबागमधील वीटभट्टी व्यवसाय सध्या आधुनिक तंत्रज्ञान आणि बांधकामाच्या बदलत्या पद्धतींमुळे आर्थिक संकटात सापडला आहे. यामुळे ५० टक्के कामगारांना फटका बसला असून, त्यांनी इतरत्र काम शोधले आहे. मातीच्या विटांना मागणी कमी झाल्याने आणि उत्पादन खर्च वाढल्याने व्यावसायिकांचे मोठे नुकसान होत आहे. .वीट बांधकामापेक्षा सिमेंट ठोकळे आणि चिऱ्यांचे बांधकाम होत असल्याने पारंपरिक मातीच्या विटांची मागणी कमी झाली आहे. पूर्वी भातशेतीची कामे संपली की आदिवासी वीटभट्टी कामाला येत होते, .Briquette Cook Stove: ऊर्जा बचतीसह ब्रिकेट्स कुक स्टोव्ह.परंतु आता या व्यवसायातील अनिश्चिततेमुळे ५० टक्क्यांहून अधिक कामगारांनी उदरनिर्वाहासाठी इतर व्यवसायांकडे मोर्चा वळवला आहे..Agri Industry Development: नवतेजस्विनी उद्यम विकास प्रकल्पातून शेतीपूरक उद्योगास चालना.भट्टीसाठी लागणारा कोळसा, भुसा आणि मजुरीच्या दरात वाढ झाल्याने नफा कमी झाला आहे. जिल्ह्यातील अलिबाग, पेण, रोहा, मुरूड या भागातील वीटभट्ट्या सध्या संकटाचा सामना करत आहेत..अवकाळी पावसामुळे यावर्षी वीटभट्टीचे काम डिसेंबर महिन्यात सुरू झाल्याने वीट तयार व्हायला उशीर झाला. कामगारांची कमतरता, वाढते दर यामुळे हा व्यवसाय धोक्यात आहे.- जीवन पाटील, वीटभट्टी व्यावसायिक.ॲग्रोवनचे सदस्य व्हाशॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.