Health Issue : सर्दी-खोकल्‍यासह अंगदुखी, डोकेदुखी वाढली

सध्या जिल्‍ह्यातील तापमानात कमालीची वाढ झाली आहे. कधी पावसाच्या सरी, तर कधी अंगाला चटके बसणारे ऊन असा वातावरणात सातत्याने चढ-उतार होत आहे.
Health Issue
Health IssueAgrowon

Panvel News : सध्या जिल्‍ह्यातील तापमानात कमालीची वाढ झाली आहे. कधी पावसाच्या सरी, तर कधी अंगाला चटके बसणारे ऊन असा वातावरणात सातत्याने चढ-उतार होत आहे. यामुळे ताप, सर्दी, अंगदुखी, डोकेदुखी यांसारख्या आजाराने डोके वर काढण्यास सुरुवात केली आहे.

वाढत्‍या आजारपणामुळे रुग्णालय रांगा लागलेल्या दिसतात. पोलादपूर, सुधागड-पाली, कर्जत या तालुक्यांमध्ये सध्या दिवसाचे तापमान सरासरी ३६-३८ अंश इतके आहे तर सर्वाधिक उन्हाचे चटके भिरा परिसरातील ग्रामस्थांना सहन करावे लागत आहेत.

भिरा येथे मंगळवारी तापमानाची नोंद सरासरी ४२ अंश इतकी नोंदवण्यात आली. त्‍यातच अधूनमधून पावसाच्या सरी कोसळत असल्याने आर्द्रतेचे प्रमाण वाढल्याने घामाच्या धारा वाहत आहेत.

Health Issue
Rural Health : ‘बाळासाहेब ठाकरे आपला दवाखाना’पासून ग्रामीण भाग राहणार वंचित

शरीरातील पाण्याचे प्रमाण कमी होत असल्याने अनेकांना अशक्तपणा जाणवत आहे. त्‍याचबरोबर अंगदुखी, पोटदुखी, ताप, सर्दी, अस्‍वस्‍थपणा वाढत आहे. उन्हापासून बचावासाठी जास्‍तीत जास्‍त पाणी प्यावे. लिंबूपाणी, फळांचे रस अधिकाधिक घ्‍यावे.

त्‍यामुळे शरीरातील पाण्याचे प्रमाण संतुलित राहिल. मसालेदार, तेलकट पदार्थ खाणे टाळण्याचा सल्‍ला डॉक्‍टरांकडून देण्यात येत आहे.

श्वसनाचे विकार

श्वसनाचा त्रास वाढण्याचा धोका तापमान वाढल्‍याने अंगाची लाहीलाही होते. त्‍यामुळे दमा आणि श्वसनाचे विकार असलेल्या रुग्णाचा त्रास वाढण्याचा धोका असतो.

शितपेयांमुळे खोकला, ताप, सर्दी वाढू शकते.याशिवाय मळमळ, उलट्या, जुलाब होण्याची शक्‍यता आहे. सध्या शेतीच्या मशागतीची कामे सुरू असल्याने राब पेटवल्याने निर्माण होणाऱ्या धुरामुळेही श्वसनाचा त्रास वाढू शकतो.

Health Issue
Bitter Gourd Health Benefit : कडू कारल्याचे आरोग्यदायी गुणधर्म
यंदा आरोग्यविषयक तक्रारी वाढल्‍या आहेत. पंधरा दिवसांपासून कोरोना रुग्णांतही वाढ होत असून लक्षणे आढळल्‍यास नागरिकांनी त्‍वरित तपासणी करून योग्‍य उपचार सुरू करावेत. घाबरण्याची गरज नाही, मात्र काळजी घेणे आवश्‍यक आहे. उन्हाळ्यात जास्तीत जास्त पाणी पिणे आवश्यक आहे.
डॉ. सुहास माने, जिल्हा शल्य चिकित्सक, रायगड

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com