Ahilyanagar News: अहिल्यानगर महानगरपालिकेच्या निवडणुकीत राष्ट्रवादी (अजित पवार) पक्षाला २७ जागा तर भारतीय जनता पक्षाला २५ अशा ६८ पैकी युतीला तब्बल ५२ जागा मिळाल्या आहेत. भाजप-राष्ट्रवादीला स्पष्ट बहुमत मिळाले आहे. शिवसेना (एकनाथ शिंदे) पक्षाला केवळ १० जागा मिळाल्या. मागील वेळीपेक्षा शिवसेनेच्या जागा घटल्या तर राष्ट्रवादी व भाजपच्या जागा वाढल्या आहेत..अहिल्यानगर महानगरपालिकेच्या निवडणुकीचा निकाल शुक्रवारी (ता. १६) मतमोजणीनंतर जाहीर करण्यात आला आहे. ६८ जागांपैकी राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार) पक्षाला २७ व भाजपला २२ जागा मिळाल्या असल्याने बहुमत झाल्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार)-भाजपची सत्ता आली आहे. शिवसेना (शिंदे) पक्षाला १० राष्ट्रवादी शिवसेना (उबाठा) पक्षाला अवघी एक जागा मिळाली. तर एमआयएमला २, काँग्रेस पक्षाला २ जागा मिळाल्या. बसपाला एक जागा मिळाली आहे..Muncipal Election Result: अवघा महाराष्ट्र भाजपमय.मागील वेळी एकत्रित शिवसेनेचे २३, एकत्रित राष्ट्रवादीचे १९, भापजचे १५, काँग्रेस ५, बसप ४, सपा १ व एका जागी अपक्ष नगरसेवक होते. निवडणुकीत महायुतीत फाटाफूट झाली, शिवसेनेने वेगळी चूल मांडली. तर दुसरीकडे महाविकास आघाडी एकसंध राहिली. एमआयएम- बसपनेही उमेदवार देऊन रंगत आणली. या वेळी शिवसेना (शिंदे) ३९ आणि पुरस्कृत १० असे ४९, राष्ट्रवादीचे ३२, भाजप २९, तर आघाडीने सर्वच्या सर्व जागांवर उमेदवार दिले होते. तसेच एमआयएमने मुकुंदनगरमधील प्रभाग ४, आणि बसपाने प्रभाग १० मध्ये उमेदवार देऊन प्रस्तापितांना आव्हान दिले होते. त्यामुळे निवडणुकीची रंगत अधिकच वाढली होती. त्यांना एका जागेवर विजय मिळवता आला..Muncipal Election Result: पुणे, पिंपरी-चिंचवडमध्ये भाजपची सरशी.महानगरपालिकेच्या निवडणुकीत केडगाव उपनगराची भूमिका नेहमीच महत्त्वाची ठरलेली आहे. या वेळी देखील ज्येष्ठ नेते भानुदास कोतकर गटाने सुरुवातीपासूनच प्रचारात आघाडी घेतली होती. परंतु कोतकर गटाने ऐनवेळी शिवसेनेचे एबी फॉर्म नाकारले. परंतु या गटाने अपक्षांचा पॅनेल करत शेवटपर्यंत प्रचारातील आघाडी कायम ठेवली. स्वतः भानुदास कोतकर यांनी प्रचार रॅली काढत या उमेदवारांचा प्रचार केला. मात्र त्यांच्याही सर्व उमेदवारांना पराभव पत्करावा लागला. शुक्रवारी सकाळी दहा वाजता मतमोजणीला सुरवात झाली. निकालात सुरुवातीपासून भाजप आणि राष्ट्रवादी (अजित पवार) पक्षाचे उमेदवार आघाडीवर होते..पक्षनिहाय मिळालेल्या जागाराष्ट्रवादी (अजित पवार) ः २७भारतीय जनता पक्ष ः २५शिवसेना (एकनाथ शिंदे) ः १०शिवसेना (उबाठा) ः १काँग्रेस ः २एमआयएम ः २बसपा : १एकूण ः ६८.ॲग्रोवनचे सदस्य व्हाशॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.