Solapur News: सोलापूर जिल्हा परिषदेच्या इतिहासात पहिल्यांदाच भाजपने ६८ पैकी ३८ जागा मिळवत काँग्रेस-राष्ट्रवादीच्या तटबंदीला खिंडार पाडत ‘एकहाती’ सत्ता मिळविली आहे. हे केवळ संख्याबळ नसून, जिल्ह्याच्या ग्रामीण भागावर असलेल्या काँग्रेस-राष्ट्रवादीच्या पारंपरिक वर्चस्वाला भाजपने दिलेले आव्हान आहे. या निकालातील सर्वात धक्कादायक बाब म्हणजे काँग्रेस आणि शिवसेना (उबाठा) या दोन्ही प्रमुख पक्षांना एकही जागा जिंकता आली नाही. त्यामुळे विरोधकांचे अस्तित्व आता थेट तळाला पोचले आहे. .आधी नगरपालिका, त्यानंतर महापालिकेतही भाजपने वर्चस्व मिळवत शहरी भागात आपली घौडदौड कायम ठेवली होती. पण जिल्हा परिषदेच्या निवडणुकीच्या निमित्ताने ग्रामीण भागात चित्र काहीसे बदलेल, अशी शक्यता होती. पण स्थानिक नेत्यांच्या अस्मितांच्या राजकारणात भाजपची पक्षीय लाट वरचढ ठरली, ही वस्तुस्थिती आहे. पण त्यातही सर्वाधिक विरोधकांतील विस्कळीतपणा, विसंवाद भाजपच्या यशाला कारणीभूत ठरल्याचे प्रथमदर्शनी दिसते. या निकालाचे सर्वात मोठे वैशिष्ट्य म्हणजे काँग्रेस आणि शिवसेनेचा (उबाठा) झालेला दारुण पराभव आहे..Solapur ZP : ‘झेडपी’च्या ४४ कर्मचाऱ्यांना आगाऊ वेतनवाढ.ज्या जिल्ह्याने एकेकाळी माजी केंद्रीय मंत्री सुशीलकुमार शिंदेंसारखे नेतृत्व दिले, तिथे काँग्रेसला ‘भोपळा’ही फोडता आला नाही. दक्षिण सोलापूर, अक्कलकोट आणि मंगळवेढा यांसारख्या बालेकिल्ल्यांमध्ये काँग्रेसचे अस्तित्व संपल्याचे हे संकेत आहेत. शिवसेनेच्या वरिष्ठ नेत्यांनी नगरपालिका, महापालिका निवडणुकीपासूनच जिल्ह्याकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष केल्याचे दिसले. या मित्रपक्षांमध्ये नसलेला समन्वय आणि भाजपची आक्रमक रणनीती यामुळे सोलापूर जिल्हा आता पूर्णपणे ‘भाजपमय’ झाला आहे..राष्ट्रवादीच्या दोन्ही गटांमधील (अजित पवार गट आणि शरद पवार गट) विभागणीचा थेट फायदा भाजपला मतांच्या ध्रुवीकरणात झाला आहे. त्या तुलनेत भाजपने अगदी बुधस्तरापासून लावलेली यंत्रणा आणि संघभावनेचे बळ फायदेशीर ठरले. मूळात विरोधकांना शिरण्यासाठी त्यांनी पुरेसा वाव दिला नाही. अक्कलकोट, दक्षिण सोलापूर आणि मंगळवेढा हे काँग्रेसचे हक्काचे तालुके आता भाजपच्या ताब्यात गेले आहेत. जिल्हा परिषदेत या पक्षांचा एकही सदस्य नसल्यामुळे, आगामी काळात या पक्षांना ग्रासरूट स्तरावरून पुन्हा बांधणी करावी लागणार आहे..Solapur ZP : क्षेत्रीय अधिकाऱ्यांच्या दौऱ्यासाठी झेडपीचा ॲप .जिल्ह्यात ‘मोहिते-पाटील’ आणि ‘शिंदे’ गटाचे राजकारणही महत्त्वाचे आहे. हे दोन्हीही गट महायुतीशी संबंधित होते, मोहिते पाटलांनी या आधीच भाजपपासून फारकत घेत, राष्ट्रवादी काँग्रेसची तुतारी हाती घेतली आहे. तर संजय शिंदे यांनी राष्ट्रवादी काँग्रेस आणि रणजित शिंदे यांनी भाजपमध्ये प्रवेश केला आहे, असे असले तरी या दोन्हीं गटांचा परफॅारमन्स त्यांच्या गडापुरता ठिक राहिला आहे. अक्कलकोटमध्ये आमदार सचिन कल्याणशेट्टी, माजी मंत्री सिद्धाराम म्हेत्रे यांच्या घराणेशाहीला मतदारांनी स्वीकारल्याचे दिसले..बार्शी तालुक्यातील निकाल तसा दुर्लक्षिण्यासारखा नाही, याठिकाणी भाजपचे माजी आमदार राजेंद्र राऊत यांना सर्वपक्षीय विरोध झाला. महाआघाडी स्थापन झाली, पण त्याठिकाणी त्यांनी विरोधकांना आस्मान दाखवत, सर्व जागा मिळवल्या. खऱ्या अर्थाने स्थानिक पातळीवर त्यांचा विजय हा व्हाईटवॅाश ठरला..पंचायत समित्यांवरही भाजपचीच मांडभाजपने जिल्ह्यातील ११ पैकी ७ पंचायत समित्या जिंकून तिथेही वर्चस्व सिद्ध केले आहे, केवळ जिल्हा परिषदस्तरावर मर्यादित नाही, तर पंचायत समितीवरही त्यांची पकड मजबूत झाली आहे. एकूणच पंचायत समित्यांवरही भाजपने आपली मांड पक्की बसवली आहे..स्थानिक आघाड्या ‘किंगमेकर’सांगोल्यात ‘शेकाप’चे आमदार बाबासाहेब देशमुख यांची सांगोला तालुका विकास आघाडी (३ जागा) आणि करमाळ्यात आमदार नारायण पाटील यांची करमाळा तालुका विकास आघाडी (२ जागा) यांनी आपली ताकद टिकवून ठेवली आहे. पक्षीय लाटेतही स्थानिक नेत्यांचे वलय कायम असल्याचे हे निदर्शक आहे..ॲग्रोवनचे सदस्य व्हाशॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.