Solapur News: सोलापूर महानगरपालिकेच्या निवडणुकीत भाजपने विरोधकांचा सुपडा साफ करत एकहाती वर्चस्व प्रस्थापित केले आहे. एकूण १०२ जागांपैकी दुपारपर्यंत ९१ जागांचे निकाल हाती आले असून भाजपने ७८ हून अधिक जागांवर विजय मिळवत सत्ता राखली आहे. विशेष म्हणजे निवडणुकीच्या तोंडावर पक्षात घेतलेल्या ‘आयात’ उमेदवारांच्या जोरावर भाजपने ही मोठी मजल मारली आहे..भाजपला रोखण्यासाठी काँग्रेस, शिवसेना (उबाठा), राष्ट्रवादी, मनसे आणि माकप यांनी ‘महाविकास आघाडी’ची मोट बांधली होती; मात्र मतदारांनी त्यांना सपशेल नाकारले. नरसिंह आसादे यांच्या रूपाने काँग्रेसला अवघ्या एका जागेवर समाधान मानावे लागले. शिवसेना (एकनाथ शिंदे गट) प्रभाग क्रमांक ७ मधून जिल्हाप्रमुख अमोल शिंदे यांच्यासह अनिकेत पिसे, मनोरमा सपाटे आणि प्रियदर्शन साठे अशा चार जागा जिंकू शकली. त्याशिवाय एमआयएमने आठ जागा जिंकत आपली ताकद पुन्हा एकदा दाखवून दिली..Municipal Election Reasult: नाशिकमध्ये भाजपला बहुमत .दुसरीकडे शिवसेना ठाकरे गटाला सोलापुरात खातेही उघडता आले नाही. निवडणूक काळात शिवसेनेचे अमोल शिंदे यांनी पालकमंत्री जयकुमार गोरे आणि आमदार देवेंद्र कोठे यांच्यावर गंभीर आरोप केले होते. महाविकास आघाडीने भाजपच्या ‘आयात’ उमेदवारांच्या धोरणावरही टीका केली होती. मात्र प्रत्यक्ष निकालात भाजपने सर्व विरोधकांना चारी मुंड्या चीत करत सोलापूर महापालिकेवर आपला भगवा फडकावला आहे..ज्येष्ठांना डावलूनही ‘कोठे-कल्याणशेट्टी’ जोडी यशस्वीया निवडणुकीत भाजपने आमदार सुभाष देशमुख आणि आमदार विजय देशमुख यांसारख्या ज्येष्ठ नेत्यांना काहीसे बाजूला ठेवत नवखे आमदार देवेंद्र कोठे आणि आमदार सचिन कल्याणशेट्टी यांच्यावर निवडणुकीची धुरा सोपवली होती. अनेक प्रभागांत निष्ठावंतांना डावलून आयात उमेदवारांना संधी देण्यात आली होती. यावरून पक्षात जुन्या-नव्यांचा वाद निर्माण झाला होता; मात्र निकालाने हे सर्व तर्क फेटाळून लावले आहेत..Maharashtra Municipal Election Results 2026: राज्यात भाजपची जोरदार मुसंडी, जाणून घ्या महापालिकानिहाय निकाल.निवडणुकीची वैशिष्ट्येप्रभाग २ मध्ये मनसे कार्यकर्त्याच्या खूनाच्या घटनेनंतरही तणावपूर्ण वातावरणात भाजपच्या तुरुंगातील उमेदवाराचा विजय.प्रभाग ३ मध्ये ऐनवेळी भाजपकडून शिवसेनेत गेलेले सुरेश पाटील यांचा अवघ्या १९ मतांनी पराभव.काँग्रेसला अवघ्या एका जागेवर यश.माकप आणि वंचित बहुजन आघाडीला खातेही उघडता आले नाही.शिवसेनेसह काँग्रेसच्या दिग्गजांचा पराभव..कल हाती आलेल्या जागा - ९१भाजप - ७८शिवसेना (शिंदे गट) - ४काँग्रेस - १एमआयएम - ८.ॲग्रोवनचे सदस्य व्हाशॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.