Apmc Election Update : छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात चारही बाजार समित्यांवर भाजप-शिवसेना युतीचे वर्चस्व

छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात रविवारी (ता. ३०) मतदान झालेल्या चारही बाजार समित्यांवर भाजप-सेना युतीचे वर्चस्व सिद्ध झाले आहे.
Apmc Election
Apmc ElectionAgrowon

Chhatrapati Sambhajinagar : छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात रविवारी (ता. ३०) मतदान झालेल्या चारही बाजार समित्यांवर भाजप-सेना युतीचे वर्चस्व सिद्ध झाले आहे. पालकमंत्री संदिपान भुमरे यांनी पुन्हा एकदा पैठण बाजार समितीमधील सत्ता अबाधित ठेवली आहे.

जिल्ह्यातील फुलंब्री कृषी उत्पन्न बाजार समितीच्या निवडणुकीत काँग्रेसच्या गत १५ वर्षांच्या सत्तेला सुरुंग लावत भाजपने एकहाती सत्ता मिळविली आहे.

या निवडणुकीत भाजपला शिवसेना शिंदे गटाचे किशोर बलांडे यांची साथ मिळाल्याने त्यांच्या पॅनेलने १८ पैकी १४ जागांवर विजय मिळविला. दुसरीकडे शिंदे गटातील ठोंबरे यांच्या पॅनेलला २ जागा मिळाल्या असून महाविकास आघाडीला एका जागेवरच समाधान मानावे लागले. हमाल व मापारी मतदार संघात नवखा कार्यकर्ता निवडून आला हे विशेष.

गंगापूर बाजार समिती निवडणुकीत भाजप शिवसेना शिंदे गटाने १८ पैकी १२ जागांवर विजय मिळवून बहुमत मिळविले. शिवसेना ठाकरे व राष्ट्रवादीच्या पॅनेलला पाच जागांवरच समाधान मानावे लागले. महाविकास आघाडीतून काँग्रेसने स्वतंत्र चूल मांडल्याने मताची विभागणी झाली, त्याचा फटका महाविकास आघाडीच्या घटक पक्षांना बसण्याची चित्र पाहायला मिळाले.

लासुर स्टेशन बाजार समितीवर भाजपचे आमदार प्रशांत बंब व शिवसेना शिंदे गटाचे आमदार प्रा. रमेश बोरणारे यांच्या पॅनेलने १८ पैकी १४ जागांवर विजय मिळवला. शिवसेना ठाकरे गटाचे उपजिल्हाप्रमुख कृष्णा पाटील डोणगावकर व राष्ट्रवादी काँग्रेसच्या पॅनेलला अवघ्या दोन जागा मिळविता आल्या. काँग्रेसच्या स्वतंत्र पॅनेलला एका जागेवर विजय मिळवणे शक्य झाले.

पैठण बाजार समितीवर राज्याचे रोहयोमंत्री तथा छत्रपती संभाजीनगरचे पालकमंत्री संदीपान पाटील भुमरे यांचे निर्विवाद बहुमत सिद्ध झाले. विरोधकांना एकही जागा जिंकता आली नाही.

सोमवारी (ता. १) पैठण पंचायत समितीच्या सभागृहात मतमोजणी प्रक्रिया पार पडली. मंत्री भुमरे यांचे बंधू राजू नाना भुमरे हे ग्रामपंचायत मतदार संघातून सर्वांत जास्त मताधिक्याने निवडून आले. या निवडणुकीत महाविकास आघाडीला किमान दोन ते तीन जागा मिळतील, असा अंदाज होता परंतु महाविकास आघाडीचा सुपडासाफ झाला. मंत्री भुमरे यांनी पैठण तालुक्यावर आपलेच वर्चस्व आहे हे या निकालावरून सिद्ध केले.

पैठण बाजार समितीचे नवनिर्वाचित संचालकांमध्ये राजूनाना भुमरे, सचिन मोगल, राम एरंडे, संभाजी तवार, राजेंद्र तांबे, विठ्ठल दोरखे, शरद नरके, बद्रीनाथ बोंबले, सुभाष मुळे, श्रीमती गंगासागर घनवट, शशिकला हजारे, शिवाजी जाधव, साईनाथ होरकटे, श्रीमती मनीषा खराद, भगवान कारके, महावीर काला, महेश मुंदडा, राजू टेकाळे यांचा समावेश आहे. निवडणूक अधिकारी म्हणून अनिल पुरी यांनी काम पाहिले तर त्यांना कृषी उत्पन्न बाजार समितीचे सचिव नितीन विखे पाटील यांनी सहकार्य केले.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com