Solapur Political Controversy : सोलापूर जिल्हा परिषदेवर आतापर्यंत बहुतांशवेळा अध्यक्ष अकलूज येथील शिवरत्न बंगल्यावरून अर्थातच मोहिते-पाटील यांच्या आदेशावरून ठरवला जात होता. पण यंदा निकालात भाजपने बाजी मारत, एकहाती सत्ता आणली आहे. यामुळे अध्यक्षपद तर नाहीच पण विरोधी पक्षनेता पदही मोहिते-पाटील गटास मिळू नये, यासाठी विरोधी पक्षातील एक गट कार्यरत झाला आहे. .मोहिते-पाटील गटाचे सदस्य ६ सदस्य वगळता (राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गट) इतर निवडून आलेल्या सदस्यांना सोबत घेत विरोधी पक्षनेता पद घेण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गट कार्यरत असल्याचे सूत्रांकडून कळते..Jalgaon Zilla Parishad: जळगाव जिल्हा परिषदेच्या अनेक पाणी योजना अपूर्ण.जिल्हा परिषदेत ६८ पैकी ३८ सदस्य हे भाजपचे निवडून आले आहेत तर राष्ट्रवादी काँग्रेसचे ११, राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे ६, शिवसेना शिंदे गटाचे ८ तर स्थानिक आघाडीचे पाच सदस्य (सांगोला ४ व पंढरपूर १) निवडून आले आहेत. पूर्ण बहुमत असल्याने अध्यक्ष भाजपचा होणार हे निश्चित आहे. विरोधी पक्षनेतेसाठी राष्ट्रवादी काँग्रेसकडून स्थानिक आघाडीच्या ५ सदस्यांना सोबत घेत, विरोधी पक्षनेतेपदावर दावा करणार आहेत. या प्रक्रियेत मोहिते-पाटील यांच्या गटास विरोधी पक्षनेता पदही न मिळण्याची व्यूहरचना आखण्यात येत असल्याचे सूत्रांकडून कळते..Solapur Zilla Parishad: विजय डोंगरे, उमेश पाटलांना संधी, साठेंची अडचण वाढली.शिंदे-मोहिते वादाची किनार...जिल्ह्यात मोहिते-पाटील व माढ्यातील शिंदे यांच्यातील वाद कायम आहे. २०१७ च्या जिल्हा परिषद निवडणुकीत तो दिसूनही आला. आता जिल्हा परिषदेत विरोधी पक्षनेतेपद मोहिते-पाटील यांच्याकडे जाऊ नये, यासाठी एक गट कार्यरत झाला आहे. यामध्ये विरोधी पक्षनेते पदावरील दावा आणखी मजबूत करण्यासाठी शिंदे भाजपची मदत घेणार असल्याचे कळते..भाजपचा आतून पाठिंबा...मोहिते-पाटील यांना विरोधी पक्षनेतेपद मिळू नये, यासाठी भाजपची आतून सहकार्याची भूमिका घेतल्याचे कळते. निवडणुकीत माजी संजयमामा शिंदे यांनी करमाळा तालुक्यात तर शहाजी पाटील यांनी भाजपसोबत आघाडी केली होती. पण भाजपची सदस्यसंख्या पाहता या राष्ट्रवादी काँग्रेस व स्थानिक आघाडीच्या सदस्यांना सोबत घेत, विरोधी पक्षनेता पद घेण्याची व्यूहरचना आखली असून त्यास भाजपचे पाठबळ देणार असल्याची चर्चा आहे..ॲग्रोवनचे सदस्य व्हाशॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.