Nashik News: संपूर्ण राज्याचे लक्ष लागलेल्या नाशिक महानगरपालिकेच्या १२२ जागांसाठी निवडणूक झाली. यात नाशिककरांनी भाजपला कौल दिला. शुक्रवारी (ता. १६) रोजी सायंकाळी ५ पर्यंत भाजपने ६४ जागांवर स्वबळावर विजय मिळवित बहुमत मिळवले आहे. तर दुसऱ्या स्थानी शिवसेना पक्षाने जागा मिळवली..महापालिकेच्या निवडणुकीत यंदा मोठा राजकीय महासंग्राम पाहायला मिळाला. शिवसेना व राष्ट्रवादी पक्षफुटीनंतरची पहिलीच मोठी परीक्षा होती. यात एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वात शिवसेनेने नाशिकमध्ये मुसंडी मारली. गेल्या दोन वर्षांत राज्याच्या राजकारणात झालेल्या मोठ्या उलथापालथींनंतर नगरपालिकेच्या निवडणुकीत सर्वाधिक पाच ठिकाणी शिंदे गटाने बाजी मारली. तर महापालिकेत भाजपने जोरदार कमबॅक करत अस्तित्व पुन्हा कायम ठेवले आहे..Maharashtra Municipal Election Results 2026: राज्यात भाजपची जोरदार मुसंडी, जाणून घ्या महापालिकानिहाय निकाल.भाजपने स्वबळाची रणनीती वापरून मंत्री गिरीश महाजन यांनी प्रतिष्ठेच्या केलेल्या या निवडणुकीत भाजपने अनेक जागांवर स्वबळाचा नारा दिला. तर शिवसेना व राष्ट्रवादी यांनी हातात हात घालून अनेक ठिकाणी भाजपच्या विरोधात शड्डू ठोकला होता. यामुळे मतदारांमध्ये काहीसा गोंधळ असला, तरी मतांचे विभाजन भाजपच्या पथ्यावर पडले..शिवसेना फुटीनंतर नाशिकमध्ये उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेने आक्रमक प्रचार केला. समवेत मनसेदेखील होती. मात्र येथे करिष्मा दिसला नाही. उद्धव व राज यांनी संयुक्तपणे सभा गाजवली; मात्र त्याचा परिणाम मतपरिवर्तनात झाला नाही. तर कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर भाजपची पकड कायम दिसून आली. तर इतर पक्षांना त्यांचे अस्तित्व सिद्ध करता आले नाही. राष्ट्रवादी काँग्रेसला (शरदचंद्र पवार) खाते उघडता आले नाही..Maharashtra Municipal Corporation Elections: काही ठिकाणी 'ईव्हीएम'मध्ये बिघाड, बोटाला लावलेली शाई पुसली जात असल्याचाही आरोप.मालेगावमध्ये इस्लाम पक्षाला सर्वाधिक ३५ जागामालेगाव महापालिकेमध्ये ८४ पैकी एक जागा बिनविरोध झाली होती. तर ८३ जागांसाठी शुक्रवारी (ता. १६) सकाळी चार वेगवेगळ्या ठिकाणी मतमोजणी झाली. इस्लाम पक्ष व शिवसेना शिंदे गटाने दणदणीत विजय मिळवला. इस्लाम पक्षाने सर्वाधिक ३५ जागा मिळवल्या. माजी आमदार आसिफ शेख यांच्या आई माजी महापौर ताहेरा शेख, काका जलील शेख हे विजयी झाले. या पक्षाने एकूण ४७ जागा लढवल्या. प्रतिस्पर्धी एमआयएमला या निवडणुकीत पिछेहाट सहन करावी लागली असून अवघ्या २० जागा मिळाल्या. शिवसेना शिंदे गटाने २४ पैकी १८ जागांवर विजय मिळवला. मात्र येथे भाजपला २६ पैकी अवघ्या २ जागा मिळाल्या. समाजवादी पक्षाला १९ पैकी ६ तर काँग्रेसला १९ पैकी ३ जागा मिळाल्या. दिवंगत समाजवादी नेते निहाल अहमद यांची कन्या शान-ए-हिंद व त्यांचे पती मुस्तकिम डिग्निटी हे दाम्पत्य समाजवादी पक्षाकडून विजयी झाले. एमआयएमचे माजी महापौर अब्दुल मलिक पराभूत झाले..मुख्य ठळक मुद्देनाशिकमधील हायव्होल्टेज लढतींमध्ये आमदार सीमा हिरे यांचे दीर योगेश हिरे पराभूतभाजपमधून बाहेर पडत अपक्ष निवडणूक लढवणारे मुकेश शहाणे विजयी, सुधाकर बडगुजर यांना धक्काविविध पक्षांचे नवखे तरुण चेहरे विजयी, अनेकांचा पुनर्प्रवेशशिवसेनेमधून (उबाठा) भाजपमध्ये दाखल झालेले सुनील बागुल यांचा मुलगा मनीष बागुल पराभूतमाजी महापौर अशोक मुर्तडक, ज्येष्ठ शिवाजी गांगुर्डे, अरुण पवार पराभूत.ॲग्रोवनचे सदस्य व्हाशॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.