BJP Performance in Assembly Elections: पाच राज्यांमध्ये झालेल्या विधानसभा निवडणुकीत पश्चिम बंगालमध्ये मोठी आघाडी घेत भाजपची विजयाकडे घोडदौड सुरू आहे. तर आसाम राज्यात पुन्हा सत्ता राखण्यात भाजपला यश मिळाले आहे. तसेच तमिळनाडूच्या राजकारणात अभिनेते आणि तमिळगा वेत्री कळघम (टीव्हीके) पक्षाचे अध्यक्ष जोसेफ विजय यांनी ऐतिहासिक विजय मिळवला आहे. केरळ विधानसभा निवडणुकीत काँग्रेसच्या नेतृत्वाखालील संयुक्त लोकशाही आघाडीने (यूडीएफ) १४० पैकी १०२ जागा जिंकून विजय मिळवला आहे. पुद्दुचेरीमध्ये ‘एआयएनआरसी’ने सर्वाधिक जागांवर आघाडी घेत विजयाचा दावा केला आहे..पश्चिम बंगालपश्चिम बंगालमध्ये निवडणूक आयोगाने दर्शविलेल्या आकडेवारीतील कलानुसार २९४ जागांच्या विधानसभेत भाजप १८४ जागांवर, तर तृणमूल काँग्रेस ९३ जागांवर आघाडीवर असल्याचे दिसत होते. मात्र, ममता बॅनर्जी यांनी हा दावा फेटाळत ‘तृणमूल’ १७० जागांवर आघाडीवर असल्याचा दावा केला. ‘आपण १७० जागांवर पुढे आहोत, त्यामुळे कुणीही आशा सोडू नका,’ असे त्यांनी कार्यकर्त्यांना सांगितले. तर पश्चिम बंगाल जिंकण्यासाठी केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी जोरदार ताकद लावली होती. स्वतः १६ दिवस बंगालमध्ये मुक्कामी राहतानाच, भूपेंद्र यादव, सुनील बन्सल आणि अमित मालवीय या तीन नेत्यांवर त्यांनी व्यूहरचनेची जबाबदारी टाकली. या तिन्ही नेत्यांनी त्यांची कामगिरी चोख बजावली आणि ममता बॅनर्जी यांचा गड उद्ध्वस्त करीत भाजपने पहिल्यांदा पश्चिम बंगाल काबीज केले..Tamil Nadu Election Results 2026: तामिळनाडूत मोठा उलटफेर, सुपरस्टार थलपती विजय यांचा 'टीव्हीके' बहुमताच्या जवळ, द्रविड पक्षांच्या वर्चस्वाला धक्का.तमिळनाडूतमिळनाडूच्या राजकारणात अभिनेते आणि तमिळगा वेत्री कळघम' (टीव्हीके) पक्षाचे अध्यक्ष जोसेफ विजय यांनी ऐतिहासिक विजय मिळवला आहे. १९७७ मध्ये एम. जी. रामचंद्रन (एमजीआर) यांनी राजकारणाची दिशा बदलल्यानंतर, तब्बल ४९ वर्षांनी राज्याला पहिला अभिनेता मुख्यमंत्री मिळणार आहे. या विजयामुळे तमिळनाडूतील सहा दशकांपासून सुरू असलेली द्रविडी पक्षांची मक्तेदारी संपुष्टात आली आहे..आसामएकेकाळी काँग्रेसचा बालेकिल्ला मानल्या जाणाऱ्या आसाममध्ये भारतीय जनता पक्षाने सलग तिसऱ्यांदा सत्तेवर पुनरागमन करून आपली पकड अधिक मजबूत केली आहे. या निकालामुळे काँग्रेसच्या पुनरागमनाच्या आशा धुळीस मिळाल्या आहेत. नेतृत्वात बदल करूनही हरवलेला जनाधार परत मिळवण्यात काँग्रेसला अपयश आले, हे स्पष्ट झाले. अहोम समाज, चहाच्या मळ्यातील कामगार आणि मुस्लिम मतदार गट यांसारख्या पारंपरिक मतदारांमध्ये विश्वास पुनर्स्थापित करण्यात काँग्रेस अपयशी ठरली. परिणामी अनेक महत्त्वाच्या मतदारसंघांत पक्षाचा पराभव झाला. १२६ सदस्यांच्या विधानसभेत मुख्यमंत्री हिमंता बिस्व सरमा यांच्या नेतृत्वावर मतदारांनी पुन्हा विश्वास दाखविला. या निवडणुकीत तब्बल ८५.९६ टक्के मतदान झाले..केरळकेरळ विधानसभा निवडणुकीत काँग्रेसच्या नेतृत्वाखालील संयुक्त लोकशाही आघाडीने (यूडीएफ) १४० पैकी १०२ जागा जिंकून दणदणीत विजय मिळवला आहे. गेल्या दहा वर्षांपासून सत्तेत असलेल्या मार्क्सवादी काँग्रेसप्रणित डाव्या लोकशाही आघाडीचा (एलडीएफ) या निवडणुकीत दारुण पराभव झाला. या निकालाने अनेक मतदानोत्तर चाचण्यांचे अंदाजही फोल ठरले आहेत. मुख्यमंत्री पिनराई विजयन (वय ८१) यांना कन्नूर जिल्ह्यातील त्यांच्या धर्मदम मतदारसंघातून पराभवाचा धक्का बसला. युवक काँग्रेसचे नेते अब्दुल रशीद यांनी त्यांचा पराभव केला. विजयन यांनी दोन दिवसांपूर्वीच मुख्यमंत्र्यांचे अधिकृत निवासस्थान रिकामे केले होते..पुद्दुचेरीपुद्दुचेरीमध्ये ‘एआयएनआरसी’ने सर्वाधिक जागांवर आघाडी घेत विजयाचा दावा केला आहे. तर भाजप चार जागांवर आघाडीवर आहे. डीएमकेला चार, टीव्हीकेलाही दोन जागा मिळाल्या आहेत. अपक्ष तीन उमेदवार विजयी झाले आहेत..West Bengal Election Results 2026: ममतांच्या हातून पश्चिम बंगाल निसटलं, भाजपची जोरदार मुसंडी.पश्चिम बंगाल (एकूण जागा २९४)पक्ष आघाडी विजयीभाजप १३१ ७३एआयटीसी ५० ३३एजेयूपी - २०एआयएसएफ - १काँग्रेस १ १सीपीआय (एम) १ -.तमिळनाडू (एकूण जागा २३४)पक्ष आघाडी विजयीटीव्हीके ६५ ४२एडीएमके २७ १८डीएमके ४ १पीएमके २ ३काँग्रेस १ ४सीपीआय १ १.केरळ (एकूण जागा १४०)पक्ष आघाडी विजयीसीपीआय (एम) - ६३आययूएमएल - २२सीपीआय - ८केईसी - ७.आसाम (एकूण जागा १२६)पक्ष आघाडी विजयीभाजप १६ ६६काँग्रेस १२ ७बीओपीएफ ३ ७एजीपी ५ ५एआययूडीएफ १ १(सर्व राज्यांची आकडेवारी सायंकाळी ७ पर्यंतची).ॲग्रोवनचे सदस्य व्हाशॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.