Crop Damage : शिरोळ तालुक्यात पाखरांकडून कोवळी पिके फस्त

Crop Protection : पिकांच्या संरक्षणासाठी शेतकऱ्यांना आता शेतात ठिय्या मारावा लागत आहे. प्लॅस्टिक कागद वापराबरोबरच डोळ्यात तेल घालून पाखरांवर लक्ष ठेवावे लागत आहे.
Crop Damage
Crop Damage Agrowon
Published on
Updated on

Kolhapur News : भुईमूग, सोयाबीन, उडीद, चवळी ही नुकतीच झालेली पिके पाखरांकडून फस्त केली जात आहेत. पिकांच्या संरक्षणासाठी शेतकऱ्यांना आता शेतात ठिय्या मारावा लागत आहे. प्लॅस्टिक कागद वापराबरोबरच डोळ्यात तेल घालून पाखरांवर लक्ष ठेवावे लागत आहे. पाखरांना शेतातून हुसकवणे हीच शेतकऱ्यांची ड्युटी बनली आहे.

मॉन्सूनपूर्व पावसाने थैमान घातल्यानंतर पंधरा दिवस पावसाने दडी मारली होती. या काळात अनेक शेतकऱ्यांनी पेरण्या आटोपल्या. तर गेल्या आठ-दहा दिवसांपासून मोठ्या प्रमाणावर शिरोळ तालुक्यात शेतकऱ्यांकडून पेरण्याची धांदल सुरू आहे. आठ-दहा दिवसांपूर्वी पेरणी केलेल्या भुईमूग, सोयाबीन, चवळी या पिकांना अंकुर फुटले आहेत. कोळ्या पिकांवर पाखरांचा उपद्रव मोठ्या प्रमाणावर जाणवू लागला आहे.

Crop Damage
Crop Damage Compensation : पीकनुकसान अनुदान वाटपाची पडताळणी सुरू

चार-पाच इंच पिकांची वाढ झाली आहे. उगवलेल्या या पिकांचे मोडदेखील अद्याप गळून पडले नाहीत. तोवरच मोड आणि कोवळी अंकुरे पाखरांनकडून फस्त केले जात आहेत. तालुक्यात गेल्या चार-पाच दिवसांपासून अनियमित पाऊस सुरू आहे. जोरदार नसला तरी हलक्या सरी सतत कोसळत आहेत. यामुळे पेरण्यांचा हंगाम साधण्यासाठी शेतकऱ्यांची गडबड सुरू आहे.

Crop Damage
Crop Damage Compensation : पीक नुकसानीच्या भरपाईसाठी सोलापुरात ६४ कोटींचा प्रस्ताव

उगवलेल्या पिकांवर पाखरांचा उपद्रव शेतकऱ्यांची डोकेदुखी बनली आहे. अनेक शेतकऱ्यांनी पाखरांना हुसकावण्यासाठी शेतामध्ये ठीकठिकाणी प्लॅस्टिक कागदांचा वापर केला आहे. मात्र याचाही पूर्णपणे उपयोग होत नाही. कागद लावला आहे, त्या ठिकाणच्या पिकांचे संरक्षण होते.

उर्वरित पिके पाखरांकडून फस्त केली जात आहेत. अशावेळी शेतकरी शेतात ठाण मांडून पाखरांचा बंदोबस्त करण्यासाठी धडपडत आहेत. पाखरांकडून कोवळी पिके खुडल्यानंतर त्या ठिकाणी दुबार पेरणी करणे हा एक उपाय शेतकऱ्यांसमोर आहे.

पंधरा दिवस महत्त्वाचे

नुकत्याच उगवलेल्या कोवळ्या पिकांवर पाखरांचा उपद्रव जाणवत आहे. आणखी पंधरा दिवस या पिकांची काळजी शेतकऱ्यांना घ्यावी लागणार आहे. अंकुराला चार-पाच पानांचा फुटवा फुटल्यानंतर पाखरांचा उपद्रव कमी होणार आहे.

भुईमूग आणि सोयाबीनची अडीच एकरात पेरणी केली आहे. मात्र पाखरांचा मोठा उपद्रव होत आहे. एकाच वेळी दोनशे-तीनशे पाखरांचा थवा शेतात घुसून कोवळी पिके फस्त करत आहेत. त्यामुळे दिवसभर शेतात ठाण मांडून पाखरांचा बंदोबस्त करावा लागत आहे. =
- राहुल ठाणेकर, शेतकरी, जयसिंगपूर

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon - Agriculture News
agrowon.esakal.com