Kerala Bird Flu : २०२५ च्या डिसेंबर महिन्यात केरळमध्ये एच५एन१ प्रकारच्या अत्यंत घातक बर्ड फ्लूचा ११ ठिकाणी संसर्ग झाल्याची माहिती जागतिक प्राणी आरोग्य संघटनाने (डब्ल्यूओएएच) सोमवारी (ता.५) दिली आहे. यामध्ये ५४ हजार १०० पक्ष्यांचा मृत्यू झाला असून यामध्ये प्रामुख्याने बदकांचा समावेश आहे. तर खबरदारीचे उपाय म्हणून ३० हजार २८९ पक्ष्यांना नष्ट करण्यात आले आहे..संसर्ग झालेल्या सात ठिकाणी १३ हजार ५०० पक्ष्यांमध्ये बदके होती. सुरुवातीच्या काळात एका बटेर फार्ममध्ये हा प्रादुर्भाव झाला. बाधित झालेल्यांपैकी कोट्टायम जिल्ह्यातील दोन भाग होते आणि उर्वरित अलाप्पुझाच्या भागात होते. डब्ल्यूओएएचच्या माहितीनुसार, सुमारे ३० किमी अंतरावर दोन क्लस्टर्समध्ये संसर्ग झाल्याचे दिसून आले..Bird flu : केरळमधील बर्ड फ्लूने कर्नाटक अलर्टमोडवर; सीमावर्ती भागात तपासणी वाढवली.या अहवालानुसार, केरळात ९ डिसेंबर रोजी बर्ड फ्लूचा संसर्ग पक्ष्यांना झाल्याचे आढळले. त्यानंतर २२ डिसेंबर रोजी बर्ड फ्लूचा संसर्ग झाल्याचे अधिकृतपणे जाहीर करण्यात आले. २०२५ च्या मे महिन्यानंतर हा पहिलाच बर्ड फ्लूचा संसर्ग मानला जात आहे..गेल्या काही वर्षात जगभरात बर्ड फ्लूने मोठ्या प्रमाणावर कुक्कुटपालन क्षेत्राला फटका बसला आहे. त्यामुळे अन्नपुरवठ्यावर परिणाम झाला. त्यामुळे पोल्ट्री उद्योगात चिंतेचं वातावरण आहे. केरळमध्ये सध्या संबंधित यंत्रणा परिस्थितीवर लक्ष ठेवून असून, संसर्गाचा पुढील प्रसार रोखण्यासाठी प्रतिबंधात्मक उपाययोजना राबवण्यात येत आहेत..Bird Flu in Andhra : आंध्र प्रदेशमध्ये कोंबड्यांना 'बर्ड फ्लू'ची लागण; शेजारील राज्यांच्या पोल्ट्रीसाठी सीमा बंद.मानवी संसर्गाचा धोका?बर्ड फ्लूच्या मानवी संसर्गाचा धोका व्यक्त केला जात आहे. परंतु केरळच्या आरोग्यमंत्री वीणा जॉर्ज यांनी नुकतेच सांगितले की, बर्ड फ्लूचा मानवी संसर्ग रोखण्यासाठी खबरदारीचे पावले उचलली जात आहेत. बाधित भागात मास्क घालणे आणि कुक्कुटपालन कामागारांना वेगळे ठेवणे, यासारखी खबरदारी घेतली जात आहे, असेही आरोग्यमंत्री जॉर्ज म्हणाल्या..ॲग्रोवनचे सदस्य व्हाशॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.