Jalgaon News: लिंबूवर्गीय पिकांतील जैवविविधता पीक उत्पादनवाढीसाठी आवश्यक आहे. जनुकीय स्रोतांचे बळकटीकरण व संवर्धन आवश्यक आहे, असे मत तज्ज्ञ, शास्त्रज्ञांनी लिंबूवर्गीय फळ पीक परिषदेतील तांत्रिक सत्रात रविवारी (ता. २१) व्यक्त केले..लिंबूवर्गीय पिकांतील जैवविविधता, त्यातील पथदर्शी सुधारणा आणि जनुकीय स्रोतांचा विकास हा या तांत्रिक सत्राचा विषय होता. डॉ. चंद्रिका रामदुगू अध्यक्षस्थानी होत्या. व्यासपीठावर डॉ. एस. के. मलिक, डॉ. अवतारसिंह, डॉ. एम. शंकरन होते..Citrus Fruit Farming: लिंबूवर्गीय फळपिकांत काढणीपश्चात तंत्र, अन्नघटक व्यवस्थापन महत्त्वाचे.यात एस. के. मलिक, एम. शंकरन, नरेंद्र सिंह यांच्यासह शास्त्रज्ञांनी आपापले संशोधन, माहिती सादर केली. त्यावर सविस्तर चर्चा व प्रश्नोत्तरेही झाली..डॉ. मलिक म्हणाले, की देशात उत्तरेसह त्रिपुरा आणि लगतच्या भागात लिंबूवर्गीय पिके आहेत. त्यासंबंधीची संस्कृतीदेखील त्या भागात वाढीस लागली आहे. स्थानिक शेतकरी आपले वाण, पिकांचे जतन, विकास करीत आहेत. त्यास बळ मिळायला हवे तसेच व्यापकता त्यात हवी आहे. केंद्र शासनाने जनुकीय संवर्धनासंबंधी कार्यक्रम जाहीर केला आहे. विविध संस्थांच्या स्तरावर प्रयत्न सुरू आहेत..Citrus Fruit Farming: लिंबूवर्गीय फळपिकांत काढणीपश्चात तंत्र, अन्नघटक व्यवस्थापन महत्त्वाचे.नरेंद्रसिंह यांनी लिंबूवर्गीय फळ पिकांतील दर्जा, त्यांचा अन्नघटकांसंबंधीचे महत्त्व किंवा वाटा यावर मुद्दे मांडले. ग्राहकांना रूचेल व त्याचा आरोग्यासही लाभ होईल, अशी चव, दर्जा मोसंबी पिकात कसा आणता येईल, त्यासंबंधीचे मुद्दे त्यांनी मांडले..एम. शंकरन यांनी संत्रा पिकासंबंधीचे प्रजनन, निश्चित वित्तीय विकास यावर आपले मनोगत व्यक्त केले. विविध शिफारसी या सत्रात तज्ज्ञांनी केल्या. त्या लागू करून लिंबूवर्गीय पीक उत्पादकांना कसा लाभ होईल व त्यातून पीकवाढीस मदत होईल, यासंबंधी मंथन करण्यात आले..ॲग्रोवनचे सदस्य व्हाशॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.