Marathawada Water Shortage : मॉन्सूनने मराठवाड्याची डोकेदुखी वाढली, अनेक विहीरी, कुपनलीकांचे पाणी आटलं

Monsoon Update : जून महिन्यातील तिसरा आठवडा आला तरी मॉन्सूनचे आगमन न झाल्याने राज्यात पाणी टंचाई भासू लागली आहे. यामुळे शेती पिकासह पिण्याच्या पाण्याचा प्रश्न बहुतांश जिल्ह्यात भेडसावू लागला आहे.
Water Shortage
Water ShortageAgrowon
Published on
Updated on

Monsoon News : जून महिन्यातील तिसरा आठवडा आला तरी मॉन्सूनचे आगमन न झाल्याने राज्यात पाणी टंचाई भासू लागली आहे. यामुळे शेती पिकासह पिण्याच्या पाण्याचा प्रश्न बहुतांश जिल्ह्यात भेडसावू लागला आहे. दरम्यान मराठवाड्यात मोठ्या प्रमाणात पाणी टंचाई जाणवू लागल्याने टँकरने पाणी देण्याची वेळ आली आहे.

मराठवाड्यातील ग्रामीण भागात पाणी टंचाई जाणवत आहे. यामुळे या भागातील अनेक ग्रामीण भागात पाण्यासाठी टँकरची व्यवस्था करावी लागत आहे. सध्या मराठवाडा विभागात ७१ गावे तर २२ वाड्यांची तहान ७७ टँकरद्वारे भागवण्यात येत आहे.

दरम्यान पुढच्या काळात पाऊस न झाल्यास आणखी टँकरची संख्या वाढण्याची शक्यता आहे. छत्रपती संभाजीनगर, जालना, नांदेड आणि हिंगोली वगळता इतर जिल्ह्यात पाणी टंचाई कमी जाणवत असल्याची माहिती समोर आली आहे.

जूनच्या सुरूवातीला मराठवाड्यात ६१ टँकरनी पाणी पोहोच केले जात होते. मात्र पाऊस न झाल्याने काही भागात विहीरींचे आणि कुपनलीकांचे पाणी आटल्याने टँकर वाढवण्यात आले आहेत. दरम्यान पावसाळा सुरू झाला तरच टँकरची मागणी कमी होण्याची शक्यता आहे.

सध्याची पाण्याची टंचाई लक्षात घेता विभागातील ७०७ विहिरींचे अधिग्रहणही करण्यात आले आहे. यामुळे प्रशासन विभागातील पाणी प्रश्नावर लक्ष ठेवून आहे.

Water Shortage
Stray Cows In UP : मोकाट गोवंशासाठी उत्तर प्रदेश सरकार अॅक्शन मोडवर ; ७५ जिल्ह्यात नोडल अधिकारी तैनात

मराठवाड्यात मागच्या दोन महिन्यांत टँकरची गरज भासली नव्हती परंतु त्यानंतर उन्हाचा वाढलेला पारा आणि पाण्याचे कायमस्वरुपी स्रोत नसल्याने पाटी टंचाई भासू लागली आहे. हवामान खात्याच्या अंदाजानुसार मॉन्सूनचे आगमन होईल असे सांगण्यात येत असले तरी पावसाची प्रतीक्षा कायम आहे.

परिणामी, तहानलेल्या गावातून टँकरची मागणी वाढत असल्याने प्रशासनाची डोकेदुखी वाढत आहे. विभागीय प्रशासनाच्या १२जूनच्या अहवालानुसार विभागातील ७१गावे, २२ वाड्यांना ९ शासकीय व ६८ खासगी असे मिळून एकूण ७७ टँकरद्वारे पाणीपुरवठा केला जात आहे.

छत्रपती संभाजीनगरची सर्वात बिकट अवस्था

छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील ३४ गावांना २६ टँकरद्वारे पिण्याच्या पाण्याची सोय केली जात आहे. तर जालन्यात २३ गावे व १८ वाड्यांना ३३ टँकरद्वारे पाणीपुरवठा करण्यात येत आहे.

याचबरोबर हिंगोली जिल्ह्यात १० गावांना १२ टँकरच्या माध्यमातून पाणीपुरवठा सुरु आहे. तर नांदेड जिल्ह्यातील तहानलेल्या ३ गावे व 4 वाड्यांना मिळून पाण्याचे एकूण ६ टँकर सुरू आहेत.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com