
Nashik News: ग्रामस्तरावर तलाठी, मंडलाधिकारी, ग्रामपंचायत कार्यालयाच्या माध्यमातून ग्रामस्थांच्या अडचणी ग्रामस्तरावर प्राधान्याने सोडविणे आवश्यक आहे. अधिकारी व कर्मचाऱ्यांनी लोकाभिमुख प्रशासनासाठी लोकसेवकाची भूमिका निभवावी, असे प्रतिपादन अन्न, नागरी पुरवठा ग्राहक संरक्षण मंत्री छगन भुजबळ यांनी केले.
येवला तालुक्यातील कुसूर, धामोडे येथील तलाठी कार्यालयाचे व नगरसूल येथील तलाठी, मंडलाधिकारी कार्यालयाच्या उद्घाटन व लोकार्पण कार्यक्रमप्रसंगी गुरुवारी (ता. ७) मंत्री भुजबळ बोलत होते. या वेळी उपविभागीय अधिकारी बाबासाहेब गाढवे, तहसीलदार आबा महाजन, धामोडेचे मंडलाधिकारी गणेश गाडेकर, गट विकास अधिकारी नम्रता जगताप, सार्वजनिक बांधकाम विभागाचे उपविभागीय अधिकारी सुमेरसिंह पाकळ आदी उपस्थित होते.
श्री. भुजबळ म्हणाले, की ग्रामस्तरावरील मंडलाधिकारी, तलाठी, ग्रामसेवक, आरोग्य सेवकांची भूमिका ही लोकसेवकाची आहे. अधिकारी, कर्मचारी यांनी ग्रामस्थांच्या अडी-अडचणी सोडवून, प्रशासन अधिक गतिमान करण्यावर लक्ष केंद्रित करावे. तलाठी कार्यालयाच्या इमारतीचे सुसज्ज बांधकाम झाल्यामुळे दस्तऐवज व्यवस्थित ठेवण्यास मदत होईल. यामुळे प्रशासकीय कामकाज अधिक गतीने होईल.
ते म्हणाले, की सौर कृषिपंप योजनेच्या माध्यमातून दिवसा वीज मिळण्यास मदत झाली आहे. तसेच मांजरपाडा हा पथदर्शी प्रकल्प साकारण्यात आलेला आहे. या प्रकल्पाचे पाणी येवल्याच्या शेवटच्या टोकापर्यंत पोहोचविण्यासाठी २६३ कोटी रुपये खर्च करून कालव्याचे काँक्रिटीकरण करण्यात आले आहे. या प्रकल्पाच्या अधिकच्या पाण्यासाठी पार गोदावरी प्रकल्प राबविण्यात येत आहे. याचा डीपीआर तयार करण्यात येत आहे.
वर्षभरात हे काम पूर्ण होऊन कामाला सुरुवात होईल. या माध्यमातून १० टीएमसी पाणी उपलब्ध होणार आहे. हे पाणी या कालव्याच्या माध्यमातून नाशिकसह मराठवाड्याला पोहोचविण्यात येणार आहे. या वेळी सरपंच सुरेखा गायकवाड, कांताबाई भड, अनिता पैठणकर, उपसरपंच मंगल कमोदकर, लता गायकवाड यांच्यासह ग्रामस्थ, पदाधिकारी उपस्थित होते.
ॲग्रोवनचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.
ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.