Rabi Crop Seeds: रब्बी हंगामासाठी अनुदानित हरभरा बियाण्याकरिता निवड होऊनही भिवापूर तालुक्यातील २५७ शेतकरी लाभापासून वंचित राहिले आहेत. .शासनाने ५३६ शेतकऱ्यांची निवड केली असताना प्रत्यक्षात केवळ २८९ शेतकऱ्यांनाच महाबीजचे बियाणे मिळाले. लक्षांक संपल्याचे कारण पुढे करण्यात आल्याने कृषी विभागाच्या नियोजनावर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. .Farmer Issue: आधार प्रमाणीकरणानंतरही कर्जमुक्ती नाही.दुष्काळी परिस्थिती लक्षात घेता शासनाने रब्बी हंगामासाठी सातबारा उताऱ्याच्या आधारे ऑनलाइन अर्ज मागविले होते. त्यानंतर लॉटरी पद्धतीने ५३६ शेतकऱ्यांची लाभार्थी म्हणून निवड करण्यात आली. मात्र, बियाण्याच्या उपलब्धतेअभावी उर्वरित २५७ शेतकरी प्रतीक्षेत आहेत. पेरणीचा हंगाम सुरू असताना बियाणे मिळत नसल्याने शेतकऱ्यांची अडचण वाढली आहे..Farmer Issue: कर्जमुक्ती योजनेतील ३० टक्के पात्र शेतकरी अद्याप लाभापासून वंचित.या प्रकाराची दखल घेत भिवापूर तालुका शेतकी सहकारी खरेदी-विक्री समितीने शासनाकडे अतिरिक्त बियाण्याची मागणी केली आहे. समितीच्या वतीने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे, कृषिमंत्री दत्तात्रय भरणे, कृषी राज्यमंत्री आशीष जयस्वाल,.कृषी आयुक्त, महाबीजचे व्यवस्थापकीय संचालक आणि जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देण्यात आले. तालुक्यासाठी अतिरिक्त निधी व बियाण्याचे उद्दिष्ट मंजूर करून उर्वरित २५७ पात्र शेतकऱ्यांना तातडीने अनुदानित हरभरा बियाणे उपलब्ध करून द्यावे, अशी मागणी समितीचे सभापती भास्कर येंगळे यांनी केली आहे..ॲग्रोवनचे सदस्य व्हाशॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.