
Bhandara News : ६५ वर्षांपूर्वी अस्तित्वात आलेली भंडारा बाजार समिती अतिक्रमणामुळे अधोगतीला गेली आहे. त्याचीच दखल घेत बाजार समिती प्रशासनाकडून विस्तारित कृषी हब उभारणीचा प्रस्ताव आहे. त्याकरिता १५२ कोटी ४४ लाख ८६ हजार ६७३ रुपंयाचा आराखडा तयार करून तो मंजुरीसाठी पणन मंडळाला पाठविण्यात आला आहे.
धानाचे कोठार अशी भंडारा जिल्ह्याची ओळख. या भागात मोठ्या क्षेत्रावर खरीप आणि रब्बी हंगामात धानाची लागवड होते. नजीकच्या काळात तिहेरी पीक पॅटर्न आत्मसात करीत शेतकऱ्यांनी भाजीपाला व फळपिकांच्या लागवडीवर देखील भर दिला आहे.
त्यातूनच भेंडी, हिरवी मिरची या पिकाखालील क्षेत्रात वाढ नोंदविली गेली आहे. हिरव्या मिरचीसह काही शेतमालाची विदेशात निर्यात देखील होते. उर्वरित शेतमाल पणन मंडळ अंगीकृत बाजारात विक्रीवर शेतकऱ्यांचा भर आहे.
भंडारा बाजार समितीत देखील शेतमालाची आवक होते. या बाजार समितीची स्थापना २९ डिसेंबर १९६० रोजी करण्यात आली. परंतु शहरी भागात असलेल्या या बाजार समितीला चारही बाजूने अतिक्रमणाचा विळखा आहे. त्यासोबतच पार्किंगचाही देखील समस्या असल्याने अनेक समस्यांचा सामना शेतकऱ्यांना करावा लागतो.
ही बाब लक्षात घेता शेतकऱ्यांना आवश्यक त्या सुविधांची पुर्तता व्हावी या करिता बाजार समिती सभापती विवेक नखाते, उपसभापती नामदेव निंबार्ते, संचालक शरद मेश्राम, हितेश सेलोकर, नरेंद्र झंझाड, विनोद थानथराटे, भगवान बावणकर, जयराम वंजारी, विजय लिचडे, रमा भुरे, पुष्पमाला मस्के, रामलाल चौधरी व सचिव सागर सार्वे यांनी पुढाकार घेतला आहे.
भिलेवाडा येथे बाजार समितीची जागा असून त्याच जागेवर उपमार्केट यार्ड उभारणी केली जाणार आहे. त्याकरिता ११ ऑक्टोबर २०२१ रोजी जय किसान उपमार्केट यार्ड भिलेवाडा म्हणून मान्यता देण्यात आली असल्याचे सांगण्यात आले.
९ एकर जागेची खरेदी
बाजार समितीकडून विस्तीर्ण असा कृषी हब उभारण्याचे प्रस्तावीत आहे. त्याकरिता २००८ मध्ये भिलेवाड्याजवळ नवा व जुना राष्ट्रीय महामार्गाच्या मधोमध असलेली गट क्र. ९४/१ मधील ३.६० हेक्टर जागेची मागणी तत्कालीन संचालक मंडळाने केली होती. त्याकरिता शासनाला २ कोटी ७५ लाख ५० हजार ४०० रुपयांच्या निधीचा भरणा करण्यात आला. त्यानंतर ही जागा बाजार समितीला हस्तांतरित करण्यात आली आहे.
अशा राहतील सुविधा
प्रस्तावीत कृषी हब मध्ये पेट्रोल, शेतकरी निवासस्थान, उपहारगृह, दीड एकरात फळे व भाजीपाला मार्केट, लिलावगृह, दीड एकरात वाहनांची पार्किंग, वेस्टेज शेतमालापासून कंपोस्ट खतनिर्मिती, सौर ऊर्जा व रेन वॉटर हार्वेस्टिंग, मासोळी बाजार, पाच हजार मेट्रिक टन क्षमतेच तीन गोदाम, शीतगृह, प्रशस्त प्रशासकीय इारत व कंपाउंड, रस्ते, पाणी सुविधा तसेच अन्य सुविधांची उभारणी या ठिकाणी होणार आहे.
ॲग्रोवनचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.
ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.