Summer Water Update: भामा-आसखेड धरणात सध्या ३० टक्के पाणीसाठा उपलब्ध असून, पिण्याच्या पाण्याचे नियोजन करण्यासाठी सिंचनाचे आवर्तन सध्या जाहीर केलेले नाही. मॉन्सून दाखल होईपर्यंत उपलब्ध पाणी राखून ठेवण्यावर प्रशासनाचा भर असल्याने शेतीसाठी पाणी सोडण्याचा निर्णय लांबणीवर पडला आहे..‘‘खेड तालुक्यातील करंजविहिरे येथील भामा नदीवरील या धरणात गेल्या वर्षीच्या तुलनेत यंदा १३ टक्के पाणीसाठा अधिक आहे. मागील वर्षी जूनमध्ये १७ टक्के साठा होता, जो यंदा ३० टक्के आहे..Agricultural Water Crisis: पिण्याच्या पाण्यासाठी शेती वाळवणार का?.मात्र, आगामी पावसाळ्यापर्यंत पिण्याच्या पाण्याचा प्रश्न निर्माण होऊ नये, यासाठी सिंचनाचे आवर्तन सध्या शक्य नाही,’’ असे सहाय्यक अभियंता आश्विन पवार यांनी स्पष्ट केले..Satara Water Issue: सातारा जिल्ह्यात वाढू लागली पाणीटंचाईची धग .या निर्णयाचा फटका खेड आणि शिरूर तालुक्यातील भाजीपाला व ऊस उत्पादक शेतकऱ्यांना बसण्याची शक्यता आहे. धरणातून पाणी न सुटल्याने भूजल पातळीवर ताण येऊन विहिरी व बोअरवेलच्या पाणीपातळीत घट होऊ शकते. पुणे महानगरपालिका, चाकण, आळंदी आणि चाकण औद्योगिक वसाहतीला याच धरणातून पाणीपुरवठा केला जातो..या वर्षी पाऊस उशिरा सुरू होत आहे. यंदा आतापर्यंत आठ आवर्तने पूर्ण झाली असून, पुढील आवर्तन आता पावसाच्या आगमनावर आणि धरण भरण्यावरच अवलंबून असेल.आश्विन पवार, सहायक अभियंता.ॲग्रोवनचे सदस्य व्हाशॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.