डॉ. आनंद गोरे, डॉ. पपीता गौरखेडे व डॉ. गणेश गायकवाडKardai Lagwad Tantra: करडई हे मराठवाड्यातील महत्त्वाचे पीक. कारण हे कमी पाण्यात घेता येणारे तेलबिया पीक आहे. अवर्षणावर मात करण्याची क्षमता या पिकात जास्त असते. त्यामुळे इतर रब्बी पिकांपेक्षा कोरडवाहू शेतीकरिता हे पीक एक वरदान आहे. करडईची लागवड करताना जमिनीची निवड, पेरणी, बियाणे, बीजप्रक्रिया, खत व्यवस्थापन योग्य पद्धतीने करणे आवश्यक असते. .करडईसाठी जमीनकरडई पिकासाठी मध्यम ते भारी तसेच खोल जमिनीची निवड करावी. ज्या जमिनीची खोली ४५ सें.मी. पेक्षा जास्त असते तिथे करडईचे पीक चांगले येते. तसेच ही जमीन पाण्याचा निचरा होणारी असावी..Safflower Varieties: करडईच्या भरघोस उत्पादनासाठी योग्य वाणांची निवड करा!.पेरणीचा कालावधीकरडई पिकाची पेरणी सप्टेंबरच्या शेवटचा आठवडा ते ऑक्टोबर १५ तारखेपर्यंत करता येते. परंतु सध्याची परिस्थिती बघता ही पेरणी परिस्थितीनुसार २० ऑक्टोबरपर्यंत करता येईल, तर बागायती करडईची पेरणी ही १५ ऑक्टोबर ते जास्तीत जास्त १५ नोव्हेंबरपर्यंत करता येते..पेरणी करताना..पेरणीसाठी दोन ओळीतील अंतर ४५ सें.मी. आणि दोन रोपातील अंतर २० सें.मी. ठेवावे. भारी जमिनीसाठी हेक्टरी १० ते १२ किलो बियाणे गरजेचे असते. तर मध्यम जमिनीसाठी हेक्टरी १२ ते १५ किलो बियाणे लागते..Rabi Season: यंदाच्या रब्बी हंगामासाठी महत्त्वाच्या गोष्टी.बीजप्रक्रिया विसरू नकाएकसारखी उगवण आणि कीड रोगांचा प्रादुर्भाव टाळण्यासाठी मर रोगाच्या प्रतिबंधासाठी ट्रायकोडर्मा १० ग्रॅम प्रति किलो बियाणे याप्रमाणे बीजप्रक्रिया करावी. किंवा कार्बेंडाझिम ३ ग्रॅम प्रति किलो अशी बीजप्रक्रिया करावी. यानंतर जीवाणू संवर्धनाची बीजप्रक्रिया करताना १० किलो बियाण्यासाटी प्रत्येकी २५० ग्रॅम अॅझेटोबॅक्टर आणि पीएसबी या जिवाणू संवर्धनाची प्रक्रिया करावी..खत व्यवस्थापनकोरडवाहू करडई पिकासाठी हेक्टरी ४०:२०:२० किलो नत्र आणि स्फुरद संपूर्ण मात्रा पेरणीच्यावेळी द्यावी. तर बागायती पिकासाठी ६०:४०:०० किलो नत्र आणि स्फुरद हेक्टरी द्यावे. यातील ३० किलो नत्र पेरणीवेळी तर उरलेले ३० किलो नत्र ३० दिवसांनी जमिनीत ओल असताना द्यावे..करडईचे वाणलागवडीसाठी (PBNS-12) परभणी करडई १२, (PBNS-86) परभणी करडई ८६, (PBNS-184) परभणी करडई १८४, (PBNS-154) परभणी करडई १५४, इत्यादी वाणांचा वापर करावा. जोखीम कमी करण्यासाठी करडई सोबत रब्बी ज्वारी किंवा हरभरा ही आंतरपीके म्हणून घेता येतील..डॉ. आनंद गोरे, डॉ. पपीता गौरखेडे व डॉ. गणेश गायकवाडअखिल भारतीय समन्वित कोरडवाहू शेती संशोधन प्रकल्प (AICRPDA),वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठ, परभणी.ॲग्रोवनचे सदस्य व्हाशॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.