Government Scheme : इंटरनेटअभावी लाभार्थी मदतीविना

Electricity Supply : वीजपुरवठा खंडित होणे, इंटरनेट नेटवर्क अस्थिर असणे अशा समस्यांमुळे लाभार्थ्यांना रोजगार बुडवून शहराची धाव घ्यावी लागत आहे.
Government Scheme
Government SchemeAgrowon
Published on
Updated on

Palghar News : नागरिकांना शासकीय योजनेचा तत्काळ लाभ घेता यावा, याकरिता ऑनलाईन प्रणालीद्वारे अर्ज सादर करावे लागत आहेत, परंतु वीजपुरवठा खंडित होणे, इंटरनेट नेटवर्क अस्थिर असणे अशा समस्यांमुळे लाभार्थ्यांना रोजगार बुडवून शहराची धाव घ्यावी लागत आहे.

बऱ्याचदा ही कामे करत असताना आठवडादेखील लागतो. त्यामुळे या लाभार्थ्यांना पदरमोड करून जव्हार शहर गाठणे आर्थिकदृष्ट्या परवडणारे नाही. शासकीय योजनेसाठी ऑनलाईन अर्ज सादर करण्याशिवाय पर्याय नसल्याने नागरिक संताप व्यक्त करत आहेत.

केंद्र सरकारने भ्रष्टाचार रोखण्यासाठी अनेक कामे ऑनलाईन केली आहेत; मात्र ही प्रणालीच नागरिकांसाठी डोकेदुखी ठरत आहे. शालेय विद्यार्थ्यांसह नागरिकांना बँक आणि प्रशासकीय कार्यालयांसह सर्वच ठिकाणी ऑनलाईन कामकाज करताना अडचणींचा सामना करावा लागत आहे. कामधंदा सोडून नागरिकांना दिवसभर कागद घेऊन फिरावे लागत आहे.

सरकारच्या सर्वच योजनांसाठी ऑनलाईन अर्ज भरावे लागतात. त्यात कधी संकेतस्थळ बंद; तर कधी सर्व्हर डाऊन, कधी नेटवर्कची समस्या; तर कधी वीज गायब होते. त्यामुळे या कामासाठी एक-एक आठवडा कामधंदा सोडून फिरावे लागते.

Government Scheme
Goverment Scheme : ‘जत्रा शासकीय योजनांची’ अभियान यशस्वी करा

अलीकडे ऑनलाईन कामे वाढल्यामुळे सामान्यांना मोठा फटका बसत आहे. मागील वर्षीचे अनुदान सरकारने ऑनलाईन पद्धतीने देण्याचा निर्णय घेतला. अनेक शेतकऱ्यांना ऑनलाईन कागदपत्र अपलोड करता आली नाहीत.

परिणामी, आजही अनेक शेतकरी अनुदानापासून वंचित आहेत. त्यामुळे सरकारने योजनांसाठी ऑफलाईनही अर्ज स्वीकारावेत, अशी मागणी होत आहे.

सध्या शेतकरी खरीप पेरणीची तयारी करत आहेत. त्यासाठी बियाणे, खते खरेदीसाठी पैशांची गरज आहे. मागील वर्षीचे अनुदान मिळणे गरजेचे आहे; परंतु ऑनलाईन प्रणालीमुळे अनुदानाचा प्रश्न ऐरणीवर आल्याने शेतकरी या अनुदानापासून वंचित राहत आहेत.
जयराम वाघ, शेतकरी
ऑनलाईन प्रणालीमुळे शेतकऱ्यांना मोठा फटका बसत आहे. शेतकरी शिकलेले नसतात. त्यातच अर्ज भरणारेही शेतकऱ्यांकडून जास्तीचे पैसे घेतात. ऑनलाईन प्रणालीमुळे शेतकऱ्यांना बहुतांश योजनांचा लाभ मिळत नाही.
सागर सातवी, शेतकरी
तालुक्यातील शेतकरी मागील अनेक दिवसांपासून गावातील तलाठ्यासह तहसीलदार कार्यालय, बँकेत सारख्या चकरा मारत आहेत. त्यांना उडवाउडवीची उत्तरे दिली जात आहेत. अनुदानासह पीएम किसानचे हप्तेही शेतकऱ्यांना मिळत नाहीत.
कुणाल उदावंत, माजी नगरसेवक

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com