Dairy App : दुग्धव्यवसायासाठी फायदेशीर पशुपोषण मोबाइल अ‍ॅप्लिकेश

Dairy Technology : बरेचसे पशुपालक अजूनही आपल्या गोठ्यातील जनावरांच्या व्यवस्थापनाच्या नोंदी ठेवत नाहीत. त्यामुळे किती पैसे खर्च होतात आणि किती येतात हे कळत नाही. परिणामी व्यवसाय नेमका फायद्यात आहे किंवा तोट्यात याचा अंदाज येत नाही.
Dairy App
Dairy AppAgrowon

Dairy Technology Update : भारतात शेतीसोबतच पशुपालन हा मुख्य व्यवसाय आहे. जनावरांचे खाद्य (Animal Feed), आजार, लसीकरण (Animal Vaccination) याशिवाय प्रजननाविषयी  विविध माध्यमातून पशुपालकाला माहिती मिळत असते. त्यामुळे आताचा पशुपालक जनावरांच्या शास्त्रशुद्ध व्यवस्थापनाविषयी बऱ्यापैकी सजग झाला आहे.

मात्र बरेचसे पशुपालक अजूनही आपल्या गोठ्यातील जनावरांच्या व्यवस्थापनाच्या नोंदी ठेवत नाहीत. त्यामुळे किती पैसे खर्च होतात आणि किती येतात हे कळत नाही. परिणामी व्यवसाय नेमका फायद्यात आहे किंवा तोट्यात याचा अंदाज येत नाही.

जनावरांच्या नोंदी ठेवणं हे अनेक पशुपालकांना कीचकट किंवा अवघड वाटत. मात्र विविध अॅपच्या माध्यमातून आपल्या जनावरांच्या नोंदी अगदी सहज ठेवता येतात.

प्रत्येकाकडे आता स्मार्ट फोन असतोच. त्यामुळे सजग आणि आपल्या व्यावसायाचं अधिक काटेकोर व्यवस्थापन ठेवू ईच्छीणाऱ्या पशुपालकांना हे अॅप अत्यंत फायदेशीर ठरतात.

पशुपालनातील व्यवस्थापनाविषयी काही संस्थांनी अतिशय उपयुक्त असलेले अॅप विकसीत केले आहेत. यापैकी नॅशनल डेअरी डेव्हलपमेंट बोर्ड ने विकसीत केलेले 'पशुपोषण मोबाइल एप्लिकेशन' या अॅपचा वापर करुन अगदी सहजपणे आपण जनावरांचे व्यवस्थापनाविषयीची माहिती मिळवू शकतो.   

Dairy App
Phule Baliraja App : विद्यापीठाचे फुले बळीराजा ॲप देणार शेतकऱ्यांना सल्ला

पशुपोषण मोबाइल एप्लिकेशन चा वापर कसा करायचा?

हे मोबाइल अ‍ॅप्लिकेशन पशुपालकांनी गुगल प्ले स्टोअरवरून अँड्रॉईड मोबाइलवर डाऊनलोड करून घ्यावे.

नोंदणी करण्यासाठी साइन अप येथे क्लिक करावे आणिनाव, गाव, तालुका, जिल्हा, मोबाइल क्रमांक आदी माहिती भरावी.

यानंतर नोंदणी या बटणवर क्लिक करावे.

क्लिक केल्यानंतर मोबाइलधारक पशुपालकाला एसएमएसच्या स्वरूपात कोड क्रमांक मिळेल.

हा कोड समाविष्ट करून लॉग इन आयडी व पासवर्ड मिळेल.

Dairy App
Agri Mobile App : शेतकऱ्यांसाठी उपयुक्त मोबाईल ॲप्स मोफत आहेत का?

लॉग इन आयडी व पासवर्ड प्रविष्ट केल्यानंतर ‘पशुपोषण मोबाइल अ‍ॅप्लिकेशन’चे मुख्य पान उघडते. या मोबाइल अ‍ॅप्लिकेशनच्या माध्यमातून शेतकरी अथवा पशुपालकांना पशू नोंदणी, आहार संतुलन आणि रिपोर्ट अहवाल या उपशीर्षकाच्या माध्यमातून माहितीचा स्रोत उपलब्ध करून देण्यात आला आहे.

पशू नोंदणी उपशीर्षकास क्लिक केल्यानंतर पशू नोंदणीसाठी बाराअंकी टॅग क्रमांक अनिवार्य आहे. यानंतर शेतकरी व पशुपालकांनी आपल्या जनावरांच्या नोंदणीसाठी आवश्यक असणारी माहिती भरावी. या माहितीमध्ये गाय, म्हैस, जात, वय, वेताची संख्या आणि सध्याची दूध देण्याची स्थिती असा तपशील भरावा.

पशू नोंदणी केल्यानंतर आहार संतुलन येथे क्लिक करावे. आहार संतुलनासाठी पशूचा तपशील, दूध उत्पादन आणि दुधाच्या फॅटचा तपशील भरावा.

दुभत्या जनावरांना सध्या देण्यात येणाऱ्या आहार व खाद्याचा तपशील भरल्यानंतर आहार संतुलन बटणवर क्लिक करावे. यानंतर संतुलित आहारविषयी सल्ला, कोणता आहार कधी द्यावा व त्याची मात्रा किती असावी याचा तपशील डाऊनलोड होईल.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com