Beed News: बीड जिल्ह्यातील ११७९ पोलिस पाटील पदांच्या भरतीसाठी रविवारी अत्यंत पारदर्शकपणे लेखी परीक्षा पार पडली. जिल्हाधिकारी विवेक जॉन्सन यांच्या नेतृत्वाखाली ३३ केंद्रांवरील ४७५ वर्गखोल्या सीसीटीव्हीच्या निगराणीखाली होत्या, ज्याचा थेट ॲक्सेस जिल्हाधिकारी कार्यालयातील वॉर रूममध्ये होता. या परीक्षेत वशिलेबाजी आणि कॉपीला कोणताही थारा नव्हता. विशेष म्हणजे, परीक्षा संपताच तासाभरात उपविभागीय स्तरावर उत्तरपत्रिकांचे स्कॅनिंगही पूर्ण करण्यात आले..परीक्षेत ज्या पद्धतीने कॉपी, वशिलेबाजीला काहीच सांध नव्हती. त्याच धर्तीवर मुलाखतीमध्येही कुठलीच हालचाल करता येणार नाही. २० गुणांच्या मुलाखतीत गुणांकणाचा फॉर्म्युलाही जिल्हाधिकारी विवेक जॉन्सन यांनी निश्चित करुन दिला आहे. .Police Patil Recruitment: पोलिस पाटील होण्याची संधी.यामध्ये उमेदवारांच्या शैक्षणिक पदव्या, अनुभवानुसार गुण असतील. २० पैकी १७ गुण वरील फॉरमॅट नुसारच उमेदवाराला मिळतील. म्हणजे प्रश्नोत्तराला केवळ तीन गुण असतील..Police Patil Bharati: बीड जिल्ह्यातील पोलिस पाटील भरतीमधील बिंदूनामावलीचा अडसर दूर.मंगळवारी लेखी परीक्षेचा निकाल जाहीर होणार असून बुधवार आणि गुरुवारी मुलाखती होतील. २० गुणांच्या मुलाखतीसाठी जिल्हाधिकाऱ्यांनी पदव्या आणि अनुभवानुसार गुणांकनाचा फॉर्म्युला निश्चित केला आहे, ज्यामुळे तोंडी परीक्षेतही वशिलेबाजीला संधी उरलेली नाही..अर्जांपैकी ४५९ परीक्षार्थी राहिले गैरहजरपरीक्षेसाठी जिल्हाभरातून एकूण ११,३४५ उमेदवारांनी अर्ज केले होते, त्यापैकी १०,८८६ उमेदवारांनी प्रत्यक्ष परीक्षा दिली, तर ४५९ उमेदवार गैरहजर राहिले. बीड केंद्रावर सर्वाधिक ४,३०५ उमेदवारांची नोंदणी होती, त्यापैकी ४,१३५ जणांनी हजेरी लावली. सर्वात कमी उमेदवार परळी केंद्रावर (८९२) होते. सकाळपासूनच परीक्षा केंद्रांवर उमेदवारांची मोठी गर्दी पाहायला मिळाली..ॲग्रोवनचे सदस्य व्हाशॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.