Water Shortage: ऑगस्ट महिना संपत आला तरी बीड जिल्ह्यात अद्याप समाधानकारक पाऊस न झाल्याने दुष्काळी परिस्थितीचे भीषण वास्तव समोर आले आहे. मागील तब्बल ६५ दिवसांपासून पावसाने ओढ दिल्याने ऐन वाढीच्या आणि फुलोऱ्याच्या टप्प्यात असलेली सोयाबीन व कापसासारखी महत्त्वाची खरीप पिके करपून जाण्याच्या मार्गावर आहेत. एकीकडे कडक उन्हामुळे आकाशातून आग बरसत असतानाच, दुसरीकडे विहिरी आणि कूपनलिकांची पाणीपातळीही वेगाने खालावली आहे. त्यामुळे पिकांना संरक्षित पाणी देणे शेतकऱ्यांच्या आवाक्याबाहेर गेले असून, निसर्गाच्या या दगाबाजीमुळे बळिराजाच्या डोळ्यांत पाणी आले आहे..खरीप हंगामाच्या सुरुवातीला पावसाने जोरदार ते मध्यम हजेरी लावल्यामुळे शेतकऱ्यांनी जुलैच्या शेवटच्या आठवड्यात मोठ्या आशेने पेरण्या उरकल्या होत्या. सुरवातीच्या पोषक वातावरणामुळे पिकांची उगवणही जोमात झाली होती. विशेषतः यंदा जिल्ह्यात मोठ्या प्रमाणावर सोयाबीनची पेरणी झाली आहे. मात्र, पिकांच्या वाढीसाठी आणि फुलोऱ्यासाठी अत्यंत आवश्यक असलेल्या काळातच पावसाने दडी मारली. सध्या सोयाबीनचे पीक साधारण ९० दिवसांचे झाले असून ते शेंगा भरण्याच्या अत्यंत निर्णायक अवस्थेत आहे. या संवेदनशील काळात जमिनीत पुरेसा ओलावा असणे अनिवार्य असते..Kharif Crop Crisis: पिके करपली खरीप अडचणीत.परंतु, ६५ दिवसांच्या खंडामुळे शेतातील ओलावा पूर्णपणे नाहीसा झाला आहे. परिणामी, सोयाबीनची पाने पिवळी पडून ती कोमेजली आहेत. तसेच, कापूस पिकाचीही मोठ्या प्रमाणावर पानगळ होत असून झाडे वाळू लागली आहेत. पाऊस आणखी काही दिवस असाच लांबल्यास शेंगा न भरणे, दाण्याचा आकार बारीक राहणे आणि उत्पादनात प्रचंड घट होणे निश्चित आहे. बियाणे, रासायनिक खते, फवारणी, मशागत आणि मजुरीवर हजारो रुपये खर्च करूनही ऐन काढणीच्या तोंडावर पाऊस रुसल्याने शेतकऱ्यांचे संपूर्ण आर्थिक गणित बिघडले आहे. या बदलत्या वातावरणामुळे किडी आणि रोगांचा प्रादुर्भाव वाढण्याची शक्यता असल्याने कृषी तज्ज्ञांकडूनही नियमित पाहणी करण्याचे आवाहन केले जात आहे..जलसाठ्यांची स्थिती चिंताजनकपावसाळा संपत आला तरी धरणांमध्ये पाणी न आल्याने जिल्ह्याची चिंता आणखीनच वाढली आहे. जिल्ह्याची पिण्याच्या पाण्याची आणि सिंचनाची मुख्य भिस्त असलेल्या एकूण १६४ लघु व मध्यम सिंचन प्रकल्पांपैकी तब्बल २८ प्रकल्प पूर्णपणे कोरडेठाक पडले आहेत. याशिवाय ७१ प्रकल्पांमधील पाणीसाठा चक्क जोत्याखाली गेला आहे. यामुळे केवळ सिंचनाचाच नव्हे, तर आगामी काळात पिण्याच्या पाण्याचा अत्यंत गंभीर प्रश्न निर्माण होण्याची दाट शक्यता आहे..El Nino Challenges: ‘एल निनो’च्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्रातील शेतीसमोरील आव्हाने.पावसाच्या या प्रदीर्घ खंडामुळे बीड जिल्ह्याभरात दुष्काळाची भीषण छाया पसरली असून, केवळ पिकेच नाही तर मुक्या जनावरांच्या चारा आणि पाण्याचा प्रश्नही अत्यंत गंभीर बनला आहे. खरीप हंगामच धोक्यात आल्याने भविष्यात जनावरांसाठी कडबा व हिरवा चारा कुठून आणायचा, असा मोठा प्रश्न शेतकऱ्यांसमोर उभा ठाकला आहे. या बिकट परिस्थितीत शासनाने तातडीने हस्तक्षेप करून जनावरांसाठी चारा छावण्या सुरू कराव्यात, अशी मागणी हतबल आणि संतप्त शेतकऱ्यांकडून जोर धरू लागली आहे..येत्या तीन ते चार दिवसांमध्ये पावसाने जर जोरदार हजेरी नाही लावली, तर कोरडवाहू शेतातील कापूस आणि सोयाबीन ही संपूर्ण पिके डोळ्यांसमोर पूर्णपणे उद्ध्वस्त झाल्याशिवाय राहणार नाहीत.- रामभाऊ जगदाळे, शेतकरी.अधिकाऱ्यांनी तातडीने प्रत्यक्ष फिल्डवर येऊन या करपून चाललेल्या पिकांची पाहणी करावी. तात्काळ मदत कशी मिळवून देता येईल, याचा पाहणी अहवाल पाठवून मदतीची प्रक्रिया सुरू करावी.- बंडू राठोड, शेतकरी.ॲग्रोवनचे सदस्य व्हाशॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.