Environmental Balance: शेतकऱ्यांनी आधुनिक तंत्रज्ञानाचा अवलंब करून मधमाशी पालनासारखे पूरक व्यवसाय स्वीकारावेत. त्यामुळे शेती फायदेशीर होण्यास मदत होईलच, शिवाय पर्यावरण संवर्धन आणि पर्यावरणीय समतोल राखण्यासही बळ मिळेल, असे प्रतिपादन किशोर पाटील यांनी केले..पाचोरा तालुक्यातील राजुरी येथे कृषी विज्ञान केंद्र, ममुराबाद फार्म, महाराष्ट्र जनुक कोष प्रकल्प आणि मूळजी जेठा महाविद्यालय यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित ‘जागतिक मधमाशी दिन’ कार्यक्रमात ते बोलत होते. ‘मधमाशी संवर्धन, परागीभवन आणि शाश्वत शेती’ या विषयावरील कार्यक्रमाला शेतकरी, विद्यार्थी आणि नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला..Bee Conservation: डंखविरहित मधमाशीचे होणार संवर्धन.कार्यक्रमाचे प्रमुख अतिथी म्हणून उपस्थित असलेल्या किशोर पाटील यांनी मधमाशी संवर्धन हे शेती आणि पर्यावरणासाठी अत्यंत महत्त्वाचे असल्याचे सांगितले. शेतकऱ्यांनी आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून मधमाशी पालनासारखे पूरक व्यवसाय स्वीकारावेत, असे आवाहन त्यांनी केले..कार्यक्रमात प्रमुख मार्गदर्शक म्हणून डॉ. मनोजकुमार चोपडा, डॉ. नम्रता महाजन आणि उमेश पाटील उपस्थित होते. त्यांनी मधमाशी पालन, आधुनिक तंत्रज्ञान आणि शेतीमधील परागीभवनाचे महत्त्व याविषयी सविस्तर मार्गदर्शन केले..Bee Conservation: मधमाशी पालनातून निसर्गाशी नाते जोडण्याचा उपक्रम प्रशंसनीय.डॉ. नम्रता महाजन यांनी मधमाशी ही केवळ मध उत्पादनासाठी नसून पर्यावरण संतुलन आणि अन्नसुरक्षेसाठीही अत्यंत महत्त्वाची असल्याचे सांगितले. विविध पिकांमध्ये मधमाश्यांद्वारे होणाऱ्या परागीभवनामुळे उत्पादनात २० ते ३० टक्क्यांपर्यंत वाढ होऊ शकते, असे त्यांनी स्पष्ट केले. फळपिके, भाजीपाला, तेलबिया आणि कडधान्य पिकांमध्ये मधमाश्यांचे महत्त्व अधोरेखित करताना त्यांनी रासायनिक कीटकनाशकांचा अतिरेक टाळण्याचे आवाहन केले. तसेच शेताच्या बांधावर फुलझाडे आणि बहुपयोगी वनस्पतींची लागवड करण्याचा सल्लाही दिला. आधुनिक मधमाशी पालन तंत्रज्ञानाविषयी माहिती देताना त्यांनी सुधारित पेट्या, कृत्रिम राणी निर्मिती, मध संकलन यंत्र, संरक्षणात्मक साधने आणि मध प्रक्रिया पद्धती याविषयी मार्गदर्शन केले..उमेश पाटील यांनी मधमाशी पालनातील प्रत्यक्ष अनुभव सांगताना योग्य व्यवस्थापन, पेट्यांची निगा, रोग व कीड नियंत्रण तसेच ऋतूनुसार वसाहतींचे व्यवस्थापन यावर माहिती दिली. मधमाशी पालनातून मध, मेण, रॉयल जेली आणि प्रोपोलिस यांसारखी मूल्यवर्धित उत्पादने तयार करून अतिरिक्त उत्पन्न मिळविता येते, असेही त्यांनी सांगितले. पाचोरा विभागाचे प्रांताधिकारी भूषण अहिरे यांनी मधमाशी संवर्धन हे पर्यावरण संरक्षणासाठी आवश्यक असून, शेतकऱ्यांनी पूरक व्यवसाय म्हणून मधमाशी पालनाचा स्वीकार करावा, असे आवाहन केले..यावेळी जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी कुरबान तडवी, आत्माचे निवृत्त उपसंचालक अनिल भोकरे आदींनी मनोगत व्यक्त केले. सूत्रसंचालन कृषी विज्ञान केंद्रातील विषय विशेषज्ञ (उद्यानविद्या) किरण जाधव यांनी केले. कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी कृषी विज्ञान केंद्राचे प्रमुख वैभव सूर्यवंशी यांनी उपस्थितांचे आभार मानले. .ॲग्रोवनचे सदस्य व्हाशॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.