Solapur News : पालख्यांच्या आगमानापूर्वी सर्व सुविधा तयार ठेवा. भाविकांना चांगल्या सुविघा द्या, असे आवाहन जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी दिलीप स्वामी यांनी केले.
जिल्हा परिषदेने सर्व विभागांतर्गत भाविकांना द्यावयाच्या सुविघांचा आढावा व्हीसीद्वारे घेतला. सर्व प्रमुख पालखी मार्गावरील मुक्कामाच्या ३४ ग्रामपंचायतींचे ग्रामसेवक व तालुका स्तरीय विभाग प्रमुख यांची आढावा बैठक घेणेत आली.
या बैठकीस अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी संदीप कोहिणकर, प्रशासन व ग्रामपंचायत विभागाचे उप मुख्य कार्यकारी अधिकारी इशाधिन शेळकंदे, पाणी व स्वच्छता विभागाचे उप मुख्य कार्यकारी अधिकारी अमोल जाधव, कार्यकारी अभियंता दीपक कुलकर्णी, कार्यकारी अभियंता खराडे, कार्यकारी अभियंता सुनीस कटकधोंड उपस्थित होते.
श्री. स्वामी म्हणाले, की आरोग्य विभागांतर्गत पालखी मार्गावरील आरोग्य केंद्रनिहाय नियुक्त वैद्यकीय अधिकारी व आरोग्य कर्मचारी यांना आदेश देणेत येत आहेत. यात्रा कालावधीत पुरविण्यात येणारा औषध साठा, पालखी मार्गावरील पाणी स्रोत गुणवत्ता अहवाल, वारकरी महिला करीता पुरविण्यात आलेल्या आरोग्य सुविधा याकडे सर्वांनी लक्ष द्यावे.
महिला वारकऱ्यांकरिता पुरविण्यात आलेल्या सेवा सुविधा, महिला आयोगाने दिलेल्या सूचनांचे पालन करण्याकरिता केलेले नियोजन याचाही त्यांनी आढावा घेतला.
तसेच कृषी विभाग अंतर्गत हरित वारी, पशुसंवर्धन विभागांतर्गत पालखी मार्गावरील रथाचे घोडे व बैल यांची तपासणी, लसीकरण, खाद्यान्न, ओषधोपचार याची पूर्वतयारी व त्याकरिता नेमण्यात आलेल्या जबादारीनिहाय आढावा घेताना आवश्यक त्या सूचना केल्या.
महिला वारकऱ्यांना माहितीसाठी चित्ररथ
जिल्ह्यातील सर्व बालविकास प्रकल्प अधिकारी आणि अंगणवाडी पर्यवेक्षिका यांना त्या त्या भागातील भाविकांच्या मुक्काम, विसावानिहाय नियोजन करणेसाठी आदेश देणेत आले आहेत. तसेच पालखी मार्गांवर महिलांसाठी ज्या सुविधा देणेत येत आहेत. या सुविधांची जाणीव जागृती करणेसाठी दोन चित्ररथही सज्ज करण्यात आले आहेत.
या मुद्द्यांचा आढावा
- स्नानगृहे व तात्पुरती शौचालय येथील पाणीपुरवठा उपलब्धता करणे.
- वीज कनेक्शन, मोटार व उंच टाकी यांची उपलब्धता करणे.
- पालखी मार्गावरील गावांना टीसीआय पावडर वाटप करणे.
- पालखी मार्ग, मुक्काम व विसाव्याच्या गावांतील रस्ते दुरुस्ती करणे.
- पालखी मुक्काम व रिंगणठिकाणी मुरुमीकरणाची मंजूर कामांचा आढावा.
ॲग्रोवनचे सदस्य व्हा
Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.
ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.