Agriculture Service Centres under Investigation: ‘‘राज्यातील बोगस बियाणे प्रकरणात दोषी आढळणाऱ्या कृषी सेवा केंद्रे आणि बियाणे पुरवठादारांविरुद्ध फौजदारी गुन्हे दाखल करण्याची प्रक्रिया सुरू झाली असून, अमरावतीसह प्रभावित जिल्ह्यांतील शेतकऱ्यांना दुबार पेरणीसाठी पुन्हा बियाणे उपलब्ध करून दिले जाईल,’’ अशी माहिती महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी दिली..बोगस बियाण्यांमुळे अनेक जिल्ह्यांतील शेतकऱ्यांवर दुबार पेरणीचे संकट ओढवल्याच्या पार्श्वभूमीवर दोषींविरुद्ध कठोर कारवाईचे निर्देश देण्यात आल्याचे बावनकुळे यांनी सांगितले. बाधित शेतकऱ्यांना नव्याने बियाणे उपलब्ध करून देण्यासाठी शासन आवश्यक उपाययोजना करीत असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले. या वेळी त्यांनी महसूल विभागातील गैरव्यवहारांवरही भाष्य केले..Fake Soybean Seeds: विदर्भात बोगस सोयाबीन बियाण्यांचा पर्दाफाश, ३०० नमुने फेल, परवाने रद्द ते फौजदारी कारवाई, मुख्यमंत्र्यांची माहिती.महाराष्ट्र जमीन महसूल संहितेच्या कलम १५५ चा गैरवापर करून काही ठिकाणी जमिनींच्या नोंदी चुकीच्या पद्धतीने बदलण्यात आल्याचे चौकशीत स्पष्ट झाले आहे. शुद्धलेखन व नावदुरुस्तीसाठी असलेल्या या तरतुदीचा वापर करून काही प्रकरणांत जमिनींची मालकी इतरांच्या नावावर करण्यात आल्याचे आढळल्याचे त्यांनी सांगितले..चौकशी समितीच्या अहवालानंतर संबंधित अधिकारी व कर्मचाऱ्यांना निलंबित करण्यात आले असून, त्यांच्याविरुद्ध फौजदारी गुन्हे दाखल करण्यात येणार आहेत. कोकण विभागातही कलम ७०(ब)चा गैरवापर झाल्याचे निदर्शनास आल्याने तेथील दोषींवरही कठोर कारवाई केली जाईल, असे त्यांनी स्पष्ट केले. प्रामाणिक अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना शासनाचे पूर्ण संरक्षण राहील, अशी ग्वाहीही त्यांनी दिली..Chandrashekhar Bawankule: कामे वेळेत न झाल्यास मला संपर्क करा: महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे.मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या वाढदिवसानिमित्त २२ जुलैपासून राज्यभर विशेष महसूल शिबिरे आयोजित करण्यात येणार असून, सेवा हमी कायद्यांतर्गत सुमारे १० लाख कुटुंबांना विविध महसुली सेवा देण्याचे उद्दिष्ट असल्याची माहितीही बावनकुळे यांनी दिली. तसेच जवळपास ५० वर्षांनंतर महसूल विभागाच्या आकृतिबंधाला मंजुरी मिळाल्याचे त्यांनी नमूद केले..राज्याच्या आर्थिक स्थितीविषयी बोलताना समृद्धी महामार्ग आणि शक्तिपीठ महामार्ग यांसारख्या पायाभूत सुविधा प्रकल्पांवरील गुंतवणूक भविष्यात राज्याच्या उत्पन्नवाढीस हातभार लावेल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला..ॲग्रोवनचे सदस्य व्हाशॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.