Beneficiary Bank Approval : लाभार्थ्यांच्या प्रस्तावाला बँकांनी तत्काळ मंजुरी द्यावी

आधार संलग्न असणाऱ्या बँक खात्यात शासनाच्या योजनेच्या लाभाची रक्कम जमा होत आहे.
Beneficiary Bank Approval
Beneficiary Bank ApprovalAgrowon

Chhatrapati Sambhajinagar : कृषीवर आधारित योजनाबाबत लाभार्थ्यांच्या प्रस्तावाला बँकांनी तत्काळ मंजुरी द्यावी. शेतकरी, महिला अनुसूचित जाती व जमाती तसेच इतर मागासवर्गीय घटकाच्या विभागातील नागरिकांच्या प्रलंबित प्रकरणाचा आढावा घेऊन त्रुटींची पूर्तता करावी व नागरिकांना गतीने लाभ मिळवून द्यावा, असे निर्देश जिल्हाधिकारी आस्तिककुमार पाण्डेय (Collector Astik Kumar Pandey) यांनी दिले.

जिल्हाधिकारी कार्यालयात आयोजित जिल्हास्तरीय बँक समितीच्या बैठकीत जिल्हाधिकारी पाण्डेय बोलत होते. जिल्हाधिकारी पाण्डेय म्हणाले, की आधार संलग्न असणाऱ्या बँक खात्यात शासनाच्या योजनेच्या लाभाची रक्कम जमा होत आहे.

आधार एनेबल असणाऱ्या बँकेच्या खात्यातही शासनाच्या योजनांची रक्कम जमा होते ही रक्कम ज्या बँकांमध्ये प्रस्ताव सादर केलेले आहेत त्याच बँकांनी लाभार्थ्यांना मिळण्याबाबत कारवाई करावी. सर्व बँकेच्या शाखेमध्ये खात्याचे एनपीए होणाऱ्या खात्याचा पाठपुरावा घेऊन सविस्तर माहिती जिल्हा प्रशासनाला सादर करावी.

Beneficiary Bank Approval
KDCC Bank : शेती, बिगरशेती संस्थांसाठी सामोपचार परतफेड योजना सुरू

खातेदाराच्या सिबिलचा दर्जा वाढवण्यासाठी प्रयत्न करावेत. ग्रामीण भागात बँक सखीच्या माध्यमातून पात्र लाभार्थ्यांपर्यंत लाभ पोहोचविण्यासाठी बँकांनी तत्परतेने कार्यवाही करावी. केंद्र व राज्य शासनाच्या विविध योजनेचा लाभ नागरिकांपर्यंत पोहोचविण्यासाठी प्रयत्न करावा.

३१ मार्चपर्यंत सर्व बँकांनी विविध योजनेच्या उर्वरित लक्ष्यांक पूर्ण करून अहवाल सादर करावा, असे निर्देशही जिल्हाधिकारी पाण्डेय यांनी दिले.

उमेद अभियाना अंतर्गत ग्रामीण भागामध्ये काम करणाऱ्या समूह बचत गटाच्या माध्यमातून बँक सखी आणि भिशी सखी यांच्या माध्यमातून बँकांनी आपली बँकिंग सुविधा ग्रामीण भागापर्यंत पोहोचवावी. बँक, शासन आणि नागरिक यांच्या समन्वयाने नागरिकांना कर्जासारख्या विविध सुविधा बँकांच्या माध्यमातून उपलब्ध करून देण्यात मदत होईल.

सर्व बँकांनी बँक सखीची नियुक्ती करण्याचे निर्देशही देण्यात आले. जिल्ह्यात विविध शासकीय योजनांची प्रभावी अंमलबजावणी केल्यामुळे प्रधानमंत्री अन्न प्रक्रिया उद्योग योजनांमध्ये प्रथम क्रमांक मिळवल्याबद्दल संबंधित बँकांचे प्रतिनिधी यांचे अभिनंदन केले.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com