Maharashtra Folk Culture: बंजारा समाजाच्या समृद्ध लोकसंस्कृतीचे दर्शन घडविणारा पारंपरिक तीज उत्सव सध्या तांड्यांसह शहरात उत्साहात साजरा होत आहे. श्रद्धा, निसर्गाशी असलेले नाते आणि लोकपरंपरांचा वारसा जपणाऱ्या या उत्सवात महिला व तरुणींचा उत्स्फूर्त सहभाग लक्षवेधी ठरत आहे..श्रावण महिन्यात साजऱ्या होणाऱ्या तीज उत्सवाला बंजारा समाजात धार्मिक व सांस्कृतिकदृष्ट्या विशेष महत्त्व आहे. उत्सवाच्या प्रारंभी बांबूच्या टोपल्या अथवा दुरड्यांमध्ये माती भरून गव्हाची पेरणी केली जाते. काही ठिकाणी वारुळाची माती वापरण्याचीही परंपरा आहे. गव्हाचे अंकुर शुभतेचे प्रतीक मानले जातात..पेरणीनंतर नऊ दिवस सकाळ-संध्याकाळ अंकुरांना पाणी दिले जाते. या काळात महिला व तरुणी पारंपरिक लोकगीते गातात. तीजच्या टोपल्या मध्यभागी ठेवून त्यांच्या भोवती फेर धरून नृत्य केले जाते. काही परंपरांमध्ये गव्हाचे अंकुर भरघोस वाढणे शुभ संकेत मानले जाते..Karhunnavi Festival: लोहारा तालुक्यात ‘कारहुन्नवी’ सणानिमित्त बळीराजाची पूजा.तीज उत्सवाचे प्रमुख आकर्षण म्हणजे बंजारा समाजाची वैशिष्ट्यपूर्ण वेशभूषा. रंगीबेरंगी पोशाख, आरशांचे काम केलेली वस्त्रे, पारंपरिक दागिने आणि विविध अलंकारांमुळे तांड्यांवर बंजारा संस्कृतीचे मनोहारी चित्र दिसून येते. डफडी व अन्य पारंपरिक तालवाद्यांच्या साथीने होणारे सामूहिक नृत्य उत्सवाची रंगत वाढविते..पारंपरिक बोलीभाषेतील लोकगीतांमधून निसर्ग, नाती-गोती, श्रद्धा आणि सामाजिक जीवनाचे दर्शन घडते. त्यामुळे तीज हा केवळ धार्मिक विधी न राहता लोकसाहित्य आणि लोककलांचे जतन करणारा उत्सव ठरतो..Firefly Festival: काजवा महोत्सवासाठी पर्यटकांची गर्दी.नोकरी, व्यवसाय व शिक्षणानिमित्त विविध ठिकाणी स्थायिक झालेले समाजबांधवही या निमित्ताने एकत्र येतात. पिढ्यान्पिढ्या चालत आलेल्या रूढी-परंपरा नव्या पिढीपर्यंत पोहोचविण्याचे महत्त्वपूर्ण काम तीज उत्सवातून होत आहे. आधुनिक जीवनशैलीत बदल होत असले तरी बोलीभाषा, लोकगीते, नृत्य, वेशभूषा आणि तांडा संस्कृती जपण्याचा प्रयत्न बंजारा समाज करीत आहे..तीज उत्सवाच्या सांगतेवेळी पारंपरिक पद्धतीने विसर्जन केले जाते. महिला, तरुणी आणि समाजबांधव मोठ्या संख्येने सहभागी होत गीत-नृत्य सादर करतात. त्यामुळे या उत्सवाला धार्मिकतेबरोबरच सामाजिक आणि सांस्कृतिक स्वरूप प्राप्त होते..५ सप्टेंबरला तीज विसर्जन मिरवणूकआर्णी येथील श्री संत सेवालाल महाराज व जगदंबा माता मंदिरात २७ ऑगस्टला तीज पेरणी करण्यात आली. नऊ दिवसांच्या उत्सवानंतर ५ सप्टेंबरला मोठ्या उत्साहात तीज विसर्जन मिरवणुकीचे आयोजन करण्यात आले आहे. या उत्सवात शहरासह तालुक्यातील बंजारा समाजातील महिला, तरुणी व युवक मोठ्या संख्येने सहभागी होणार आहेत..ॲग्रोवनचे सदस्य व्हाशॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.