Agriculture Market Bulletinसोयाबीनमध्ये चढ उतारदेशातील बाजारात सोयाबीनच्या भावात कालपासून काहीसे चढ उतार सुरु आहेत. सोयाबीनला सध्या चांगला उठाव आहे. तसेच बाजारातील सोयाबीनची आवक कमी झालेली आहे. तेलाचे भावही टिकून आहेत. असे असले तरी युध्दाविषयी घडत असलेल्या घडामोडींचा बाजारावर परिणाम दिसत आहे. सध्या सोयाबीन प्रतिक्विंटल सरासरी ५ हजार १०० ते ५ हजार ५०० रुपयांच्या दरम्यान विकले जात आहे. सोयाबीनला पुढील काळातही चांगला उठाव राहण्याची शक्यता आहे. त्यामुळे सोयाबीनचे भाव काही दिवस टिकून राहू शकतात, असा अंदाज सोयाबीन बाजारातील अभ्यासकांनी व्यक्त केला आहे. .मक्यात काहिशी सुधारणा देशातील बाजारात मागील काही दिवसांपासून मक्याच्या भावात वाढ दिसून आली आहे. मक्याला सध्या उठाव वाढत आहे. बाजारातील आवकही अनेक भागात कमी झालेली आहे. यामुळे सरासरी भावात मागील काही दिवसांपासून काहिशी सुधारणा दिसून आली आहे. सध्या मका प्रतिक्विंटल सरासरी १७०० ते १९०० रुपयांच्या दरम्यान विकला जात आहे. पुढील काळात मक्याची बाजारातील आवक आणखी नरमण्याची शक्यता आहे. याचा आधार मक्याच्या भावाला राहू शकतो, असा अंदाज मका बाजारातील अभ्यासकांनी व्यक्त केला आहे. .Agrowon Podcast : सरकी, कापूस, सोयाबीन भाव टिकून; डाळिंब तेजीत तर मक्याचे दर स्थिरावले.गव्हाचे भाव स्थिरावलेदेशातील बाजारात गव्हाची आवक वाढत आहे. यंदा गव्हाचे उत्पादन चांगले असल्याचे शेतकरी सांगत आहेत. गव्हाला मागणी स्थिर आहे. सध्या बाजारावर गहू आवकेचा दबाव आहे. यामुळे सध्या हमीभावापेक्षा कमी भावात गव्हाची विक्री होत आहे. यंदा सरकारने गव्हासाठी २ हजार ५८५ रुपये हमीभाव जाहीर केला आहे. तर बाजारात गहू २२०० ते २७०० रुपयांपर्यंत विकला जात आहे. गव्हाच्या भावावरील दबाव आणखी काही दिवस कायम राहू शकतो, असा अंदाज गहू बाजारातील अभ्यासकांनी व्यक्त केला आहे. .Agrowon Podcast: सरकीचा भाव तेजीत; कापूस टिकून, सोयाबीनमध्ये चढ उतार, खरबूजाला उठाव तर टोमॅटो आवक टिकून.कैरीला उठावराज्यातील बाजारात मागील काही दिवसांपासून कैरीची आवक काहिशी वाढली आहे. तर कैरीला उठावही मिळत आहे. आंबा पिकाला मागील दोन आठवड्यांमध्ये वादळी वारे आणि गारपीटीचा तडाखा बसला आहे. याचाही आवकेवर परिणाम दिसत आहे. सध्या कैरीला बाजारात २२०० ते ३ हजार रुपये प्रतिक्विंटलच्या दरम्यान भाव मिळत आहे. कैरीची बाजारातील आवक पुढील काही दिवसांमध्ये वाढण्याची शक्यता आहे. याचा दरावर दबाव राहू शकतो, असा अंदाज व्यापारी आणि जाणकार शेतकरी व्यक्त करत आहेत. .काकडीला उठावराज्यातील बाजारात काकडीला चांगला उठाव मिळत आहे. सध्या उन्हाचा तडाखा वाढला आहे. त्यामुळे काकडीलाही उठाव आहे. तर मागील आठवडाभरात झालेल्या वादळी पावसाचा आणि गारपीटीचा काही भागातील काकडी पिकाला फटका बसल्याचे शेतकरी सागंत आहेत. सध्या बाजारात काकडीला प्रतिक्विंटल सरासरी १२०० ते १४०० रुपये भाव मिळत आहे. काकडीला पुढील काळातही उठाव चांगला राहण्याची शक्यता आहे. त्यामुळे दराला आधार राहील, असा अंदाज जाणकारांनी व्यक्त केला आहे. .ॲग्रोवनचे सदस्य व्हाशॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.