Ahilyanagar News: कोपरगाव तालुक्यात शेतकरी केळी उत्पादनाकडे वळत असून, ‘महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजने’ (मनरेगा) अंतर्गत केळी लागवडीला चांगला प्रतिसाद मिळत आहे. रवंदे येथे बुधवारी (ता. ४) जिल्हाधिकारी पंकज आशिया यांनी मनरेगा योजनेअंतर्गत केळी लागवड क्षेत्राची पाहणी करून शेतकऱ्यांशी प्रत्यक्ष संवाद साधला. यावेळी त्यांनी केळी पिकाची वाढ, व्यवस्थापन तसेच शेतकऱ्यांना मिळणाऱ्या योजनांच्या लाभांची माहिती घेतली..तालुक्यातील रवंदे, ब्राह्मणगाव, तळेगाव - मळे, करंजी, ओगदी, धोत्रे, खोपडी गावातील सुमारे २२ हेक्टर क्षेत्रावर केळी लागवड रोजगार हमी योजनेतून करण्यात आली आहे. रवंदे शेतकरी उत्पादक कंपनीच्या सदस्यांनी योजनेतून केळी लागवड करून उत्पादन वाढीसाठी पुढाकार घेतला आहे..Banana Cultivation: आगाप मृग बहर केळी लागवडीची तयारी सुरू.जिल्हाधिकारी क्षेत्र भेटीप्रसंगी प्रांताधिकारी (शिर्डी) माणिक आहेर, तहसीलदार महेश सावंत, कोपरगाव, तालुका कृषी अधिकारी मनोज सोनवणे, रवंदे शेतकरी उत्पादक कंपनीचे संचालक प्रवीण कदम, मंडळ कृषी अधिकारी (कोळपेवाडी) तेजस्वी मोटे, उपकृषी अधिकारी (कोळपेवाडी) राजेश तुंबारे, सहायक कृषी अधिकारी योगेश माळी, धामोरी-रवंदे तसेच लाभार्थी शेतकरी उपस्थित होते..पारंपरिक पिकांना पर्यायपारंपरिक पिकांना पर्याय म्हणून उत्पन्नवाढीसाठी केळी फळपिकाची लागवड शेतकऱ्यांकडून करण्यात येत आहे. त्याकरिता कृषी विभागामार्फत सर्व सहकार्य करण्यात येत आहे. शेतकऱ्यांनी या योजनांचा लाभ घ्यावा, असे आवाहन विभागामार्फत याप्रसंगी करण्यात आले..ॲग्रोवनचे सदस्य व्हाशॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.