Pune News: हवामानातील अनिश्चिततेमुळे हवेत वाढलेल्या आद्रतेने इंदापूर तालुक्यातील केळी पिकावर करप्या रोगाचा प्रादुर्भाव वाढत आहे. शेतकरी कीड नियंत्रण करून पीक वाचविण्यासाठी उपाययोजना करीत आहेत. फवारणीचा आर्थिक खर्च भागवताना उजनी परिसरातील उत्पादक मेटाकुटीला आले आहेत..केळीच्या झाडावर मायक्रोस्पेरीला म्युसीकोला बुरशीमुळे करप्या हा रोग येतो. हवामानातील बदलामुळे व सततचा लागून राहिलेल्या पावसामुळे या रोगाचा प्रादुर्भाव केळीवर झाला आहे. उजनीकाठच्या वरकुटे बुद्रुक, अगोती नं.२, कळाशी, गंगावळण, कालठण या भागातील प्रामुख्याने केळींमध्ये करप्याचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणात वाढत आहे. केळी उत्पादक शेतकऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार मे महिन्यामध्ये झालेल्या अवकाळी पावसामुळे यावर्षी एक महिना अगोदरपासूनच करप्या केळी पिकावर जाणू लागला आहे. .Banana Farming : इंदापूरच्या शेतकऱ्यांची केळी पिकाला पसंती.दरवर्षी शेतकरी करप्या रोगासाठी अगोदरपासूनच प्रतिबंधात्मक उपाययोजना राबवत असतात. परंतु हवामानाच्या अनिश्चिततेमुळे वातावरणातील वाढलेल्या आद्रतेमुळे करप्या हा सप्टेंबर- ऑक्टोबर ऐवजी जुलै महिन्यातच केळीवर आल्याने शेतकरी हवालदिल झाले. करपा रोगाच्या प्रादुर्भावावर प्रतिबंधात्मक उपाय म्हणून कोणतीही उपाय योजना राबवली नसल्यामुळे सद्यस्थितीला शेतकरी हे फक्त बुरशीनाशक व कीटकनाशक फवारण्या, ठिपके असलेले पाने कापून टाकणे इत्यादी उपायांवर केळी पीक वाचवण्याचा प्रयत्न करत आहेत. .Banana Farming: केळी बागेत अन्नद्रव्ये, सिंचन व्यवस्थापनावर भर .झाडांच्या फळधारणा कालावधीमध्ये बागेत करप्याचा शिरकाव झाल्यास झाडांना फळ धारणे वेळी अडचणी येतात. केळीच्या घडाचा आकार छोटा व फळांची संख्या देखील कमी होते. करप्यामुळे अनेक झाडांचे नुकसान होऊन त्याचा प्रत्यक्ष फटका अंतिम टप्प्यात असलेल्या केळी बागेतील विक्रीयोग्य मालावर होत आहे..हातातोंडाशी आलेला घास हिरावण्याची भीतीकमी बाजारभाव मिळून शेतकऱ्यांना आर्थिक भुर्दंड बसत आहे. निर्यातक्षम केळीवरदेखील करप्याचा मोठा परिणाम झाली असून बुरशीनाशक फवारण्यासाठी अनपेक्षितपणे अधिकचा खर्चदेखील वाढला आहे. हाततोंडाला आलेली केळी पीक करप्यामध्ये वाया जाते की काय,अशा भीतीने केळी उत्पादक धास्तावले आहेत..करपा जमिनीवरून खोडामार्गे झाडाच्या पानांवर करप्या रोगाचा प्रादुर्भाव वाढत जातो. बाह्य औषधांचा वापर करून करप्या रोग आटोक्यात आणण्यापेक्षा जमिनीचा पोत सुधारण्यावर शेतकऱ्यांनी लक्ष देणे आवश्यक आहे. जमिनीचा चांगला पोत आणि पाण्याचे सुयोग्य नियोजन केल्यास करप्या आटोक्यात येतो.-विजयसिंह बालगुडे, वसंतराव नाईक शेतीनिष्ट शेतकरी पुरस्कारप्राप्त शेतकरी.ॲग्रोवनचे सदस्य व्हाशॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.