Bamboo Cultivation : सिंधुदुर्गात ४०० हेक्टर क्षेत्रावर बांबू लागवड

Bamboo Production : जिल्ह्यात मागील काही वर्षांपासून बांबू लागवडीकडे वाढलेला कल या वर्षी देखील कायम राहिला आहे. या वर्षी जिल्ह्यात ४०० हेक्टर क्षेत्र बांबू लागवडीखाली आले आहे.
Bamboo Cultivation
Bamboo Cultivationagrowon
Published on
Updated on

ॲग्रोवन वृत्तसेवा

Sindhudurg News : सिंधुदुर्गनगरी ः जिल्ह्यात मागील काही वर्षांपासून बांबू लागवडीकडे वाढलेला कल या वर्षी देखील कायम राहिला आहे. या वर्षी जिल्ह्यात ४०० हेक्टर क्षेत्र बांबू लागवडीखाली आले आहे. त्यामुळे जिल्ह्यातील बांबू लागवडीखालील एकूण क्षेत्र ३ हजार ९७६.५५ हेक्टर इतके झाले आहे.

सिंधुदुर्ग जिल्ह्यात आंबा, काजू, नारळ, सुपारी आदी फळपिकांची लागवड अधिकतर केली जाते. पंधरा, वीस वर्षांत केवळ आंबा, काजूच्या लागवडीत झपाट्याने वाढ होत गेली. मात्र मागील काही वर्षांपासून बदलत्या वातावरणाचा मोठा फटका सातत्याने जिल्ह्यातील सर्वच फळपिकांना बसू लागला आहे. त्यामुळे शेतकऱ्यांचा फळपिकांकडील कल काहीसा कमी होऊ लागला आहे.

Bamboo Cultivation
Bamboo Cultivation : ‘हरित महाराष्ट्र’अंतर्गत ‘मनरेगा’तून बांबू लागवड

काजू लागवडीऐवजी आता शेतकरी बांबू लागवडीकडे वळू लागले आहे. शासनाने राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेत बांबू लागवड समाविष्ट केल्यामुळे शेतकऱ्यांनी मोठ्या प्रमाणात लागवड केली आहे. यापूर्वी केवळ बांधाच्या कडेवर लागवड करणारे शेतकरी आता पूर्णपणे बांबू लागवड देखील करीत आहेत. अनेकांनी काजू लागवडीच्या बांधावर बांबू लागवड केलीआहे.

या वर्षी जिल्ह्यात ४०० हेक्टरवर बांबू लागवड करण्यात आली. त्यामुळे आता जिल्ह्यातील बांबू लागवडीखालील क्षेत्र हे ३ हजार ९६८.५५ हेक्टरवर पोहोचले आहे. बांबू लागवडीवर वातावरणाचा कोणताही परिणाम होत नाही. याशिवाय बाजारपेठ मिळविण्यासाठी काहीही प्रयत्न करावे लागत नाहीत आणि दर देखील चांगला मिळतो. त्यामुळे शेतकरी बांबू लागवडीकडे वळत असल्याचे चित्र आहे.

शेतकऱ्यांना बांधावर किंवा सलग क्षेत्रात योजनेअंतर्गत बांबू लागवड करता येते. शासन तीन वर्षांत हेक्टरी ६६ हजार ९५३ रुपये अनुदान शेतकऱ्यांना देते. सलग लागवड केल्यास हेक्टरी ४०० कंद आणि बांधावर लागवड केल्यास हेक्टरी १०० कंद लागवडीचे अनुदान शेतकऱ्यांना देण्यात येते.

- बाळकृष्ण परब, सहायक गटविकास अधिकारी, सिंधुदुर्गनगरी

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon - Agriculture News
agrowon.esakal.com