Pune News: ‘‘जागतिक तापमान वाढीचा थेट दुष्परिणाम आता गाव-खेड्यांपर्यंत पोहोचला आहे. महाराष्ट्राचे उन्हाळ्यातील सरासरी तापमान ४५ अंश सेल्सिअसपर्यंत पोहोचले आहे. ४७ अंश सेल्सिअस तापमान मानवी मेंदू, हृदय आणि मूत्राशयावर परिणाम करणारे आहे. यामुळे हे दुष्परिणाम रोखण्यासाठी तातडीने बांबू लागवड करणे पर्यावरणाच्या आणि मानवी आरोग्याच्या हिताचे आहे,’’ असे मत कृषी मूल्य आयोगाचे अध्यक्ष पाशा पटेल यांनी व्यक्त केले. .डेक्कन एज्युकेशन सोसायटीच्या आयएमडीआर संस्थेत आयोजित ‘बांबू लागवड आणि जागतिक तापमान वाढ’ या चर्चासत्रात ते शनिवारी (ता.७) बोलत होते. या वेळी संस्थेचे संचालक अशोक पलांडे उपस्थित होते..Bamboo Industry: बांबू उद्योगाला प्रोत्साहन देण्यासाठी सरकारकडून उपाययोजना; विधानसभेत वनमंत्री गणेश नाईक यांचे आश्वासन.श्री. पटेल या वेळी म्हणाले, ‘‘उन्हाळा सुरू झाला की आपत्ती व्यवस्थापन विभाग दुपारी १२ ते ४ चार बाहेर पडू नये, अशा सूचना देतात. हा कालावधी आता वाढत आहे. भविष्यात उन्हाळ्यातील ही समस्या वाढणार असून, वाढत्या उष्णतेचा परिणाम थेट मानवी मेंदू, हृदय आणि मूत्राशयावर होणार आहे. यामुळे पर्यावरण संतुलनासाठी इंधनाचा कमीत कमी वापर, जास्तीस जास्त वृक्षाच्छादन होणे गरजेचे आहे.’’.Bamboo Farming: बांबूला हवा मूल्यसाखळीचा आधार.सध्या सर्वाधिक कार्बन उत्सर्जन हे औष्णिक उर्जा प्रकल्पासाठीच्या कोळसा आणि पेट्रोल- डिझेलमधून होत आहे. हे कार्बन उत्सर्जन शोषणासाठीचा सर्वाधिक वेग हा केवळ बांबूमध्ये असून, बांबू लागवड आणि उद्योग धोरणामुळे शेतकऱ्यांना पर्यायी उद्योग आणि पर्यावरण संतुलन राखले जाणार आहे..यासाठी राज्याच्या अर्थसंकल्पात बांबू लागवड आणि मूल्यसाखळी विकसित करण्याचे धोरण आखले आहे. तसेच बांबूपासून मिथेनॉलचे देखील उत्पादन होणार आहे. यामुळे बांबू संशोधन आणि उद्योगामध्ये मोठ्या संधी असून, विद्यार्थ्यांनी या संशोधनात आले पाहिजे, असे मतही त्यांनी व्यक्त केले..ॲग्रोवनचे सदस्य व्हाशॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.