Bamanwas Kankar First Fully Organic Village In Rajasthan: राजस्थानमधील बामनवास कांकर ग्रामपंचायतीने शाश्वत भविष्य सुनिश्चित करण्याच्या दिशेने ठोस पावले उचलली आहेत. विशेष म्हणजे ही राज्यातील पहिली पूर्णतः सेंद्रिय प्रमाणित ग्रामपंचायत बनली आहे. बामनवास कांकर ही नव्याने स्थापन झालेल्या कोटपूतली-बहरोड जिल्ह्यातील सात वाड्यांचा समावेश असलेली पंचायत आहे. या ग्रामपंचायतीने केवळ मातीचा ऱ्हास आणि भूजल पातळीत घटीची समस्या सोडवण्यासाठीच नव्हे, तर रासायनिक शेतीशी संबंधित निर्माण होणाऱ्या आरोग्यविषयक समस्यांची गंभीर दखल घेत उपाययोजना केल्या आहेत. त्याचे चांगले परिणाम दिसून आले आहेत..बामनवास कांकरमधील शेतकरी आता त्यांच्या शेतीत रासायनिक कीडनाशके आणि खतांचा वापर करत नाहीत. तर त्यांच्या पशुपालन पद्धती पर्यावरणपूरक आणि आरोग्याविषयक नियमाला धरून आहेत. या एकात्मिक दृष्टिकोनामुळे शेती, पशुपालन आणि पर्यावरण संरक्षण या तिन्ही गोष्टी एकत्रितपणे पुढे जातील, याची खात्री झाली आहे, असे येथील सरपंच सांगतात..गेल्या वर्षी गावकऱ्यांनी एकत्रित चर्चा करुन सेंद्रिय पद्धतीकडे वळण्याचा निर्णय घेतला. शेतकऱ्यांना मातीची सुपीकता कमी झाल्याचे लक्षात आले. तसेच वाढत्या उत्पादन खर्चामुळे शेती करणे परवडत नव्हते. त्यात रासायनिक खतांच्या दीर्घकाळ वापरामुळे आरोग्याच्या समस्या निर्माण होत असल्याची जाणीव झाली. या चिंतांमुळे शेतकऱ्यांची मानसिकता हळूहळू अल्पकालीन उत्पादनांवर लक्ष केंद्रित करण्याऐवजी दीर्घकालीन शाश्वततेकडे वळली. सेंद्रिय शेती पद्धतींत पीक पद्धतीत बदल आणि मल्चिंगचा समावेश आहे. तर कृषी निविष्ठांमध्ये प्रामुख्याने गांडूळखत, सेंद्रिय माती कंडिशनर्स आणि कीड नियंत्रणासाठी सापळे यांचा समावेश केला जात असल्याचे सांगण्यात आले आहे..Organic Sugar Export: आता परदेशात जाणार भारताची सेंद्रिय साखर, ५० हजार टनांपर्यंत निर्यातीला परवानगी.नैसर्गिक संसाधनांचे संवर्धन, शाश्वत शेती आणि महिला सक्षमीकरणासाठी काम करणाऱ्या कोफार्मिन फेडरेशन ऑफ ऑरगॅनिक सोसायटीज आणि प्रोड्यूसर कंपनीज (COFED) या गटाने सेंद्रिय शेतीसाठी शेतकऱ्यांना सहकार्य केले. त्यांनी याबाबत तांत्रिक मार्गदर्शन आणि संस्थात्मक पाठबळ दिले. यामुळे शेतकऱ्यांना सेंद्रिय शेती पद्धती, प्रमाणन प्रक्रिया आणि बाजारात सेंद्रिय शेतमाल पाठविण्यासाठी मदत मिळाली. सेंद्रिय पद्धतींमुळे मातीचे आरोग्य सुधारेल, ओलावा टिकवून ठेवण्याची क्षमा वाढेल आणि भूजलाचे रासायनिक प्रदूषिततेपासून संरक्षण होईल, अशी अपेक्षा व्यक्त करण्यात आली आहे. .Organic Farming: पीक उत्पादन स्थिरतेमध्ये जैविक घटक बायोमिक्स महत्त्वाचे.शेतकऱ्यांना आता उपयुक्त कीटक आणि मातीतील सूक्ष्मजीवांसह वाढलेली जैवविविधता पाहायला मिळत आहे. या प्रमाणनामुळे प्रमुख बाजारपेठांत त्यांच्या शेतमालाला मागणी मिळाली. तसेच महागड्या रासायनिक निविष्ठांवरील अवलंबित्व कमी झाले. सेंद्रिय पद्धतींचा वापर केल्याने पशुधनाचे आरोग्य सुधारले. तसेच अधिक सुरक्षित दुग्धजन्य उत्पादने मिळण्यासाठी मदत झाली. यामुळे त्यांच्या उत्पादनांचे बाजारमूल्य वाढल्याचे दिसून आले आहे..शेतकरी अनुकूल मॉडेलरसायनमुक्त शेतीमुळे गावकऱ्यांना सुरक्षित अन्न आणि आरोग्यदायी जीवनशैली मिळाली. सेंद्रिय पद्धतींचा अवलंब करुन शेतकरी अनुकूल अशा शेती मॉडेलच्या दिशेने वाटचाल केली आहे. रासायनिक कीडनाशकांचा वापर थांबवल्याने मातीचे आरोग्य, पीक गुणवत्ता, ग्रामीण भागातील कुटुंबांचे एकूणच आरोग्य आणि जीवनमान सुधारले. सेंद्रिय शेती हा निरोगी भविष्याचा पाया असल्याचे येथील ग्रामस्थ सांगतात. .ग्रामस्थांनी घेतली शपथया प्रभावी उपाययोजनांची औपचारिक नोंद म्हणून, पंचायतीने २ जानेवारी रोजी रासायनिक शेतीविरोधात शपथ घेण्याचा कार्यक्रम आयोजित केला. यावेळी शेतकरी, पशुपालक, स्थानिक नेते उपस्थित राहिले होते. कीडनाशकविरहित शेती, सेंद्रिय पद्धतीने पशुपालन आणि पर्यावरणपूरक भूमी व्यवस्थापन या पद्धतींचा अवलंब करण्याची शपथ घेण्यात आली. .ॲग्रोवनचे सदस्य व्हाशॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.