Thorat Sugar Factory : थोरात कारखान्यावर सभासद, जनतेचा मोठा विश्वास ः थोरात

Balasaheb Thorate : संगमनेर तालुक्यातील समृद्धी, झालेली विकास कामे, निळवंडे धरण, कालव्यांची कामे यामागे सततचे कष्ट आहे. त्यातून हे उभे राहिले आहे.
Sugar Factory
Sugar FactoryAgrowon
Published on
Updated on

Ahilyanagar News : राजकारण हे नेहमी समाजाच्या विकासासाठी करायचे असते. हे तत्त्व घेऊन आपण सर्वांना सोबत घेऊन सातत्याने काम केले. संगमनेर तालुक्यातील समृद्धी, झालेली विकास कामे, निळवंडे धरण, कालव्यांची कामे यामागे सततचे कष्ट आहे.

त्यातून हे उभे राहिले आहे. सहकाराबरोबर तालुक्यातील विकास कायम ठेवायचा असून चांगल्या कारभारामुळे थोरात कारखान्यावर सभासद शेतकरी व तालुक्यातील जनतेचा मोठा विश्वास असल्याचे मत माजी महसूलमंत्री बाळासाहेब थोरात यांनी व्यक्त केले.

Sugar Factory
AI In Sugar Factory : साखर कारखान्यांचे उतारामापन, वजनकाटे ‘एआय’खाली आणा ; राजू शेट्टी

गुंजाळवाडी (ता. संगमनेर) येथे कारखाना सभासद शेतकरी, युवकांच्या स्नेहसंवाद मेळावा झाला. माजी महसूलमंत्री बाळासाहेब थोरात, माजी आमदार डॉ. सुधीर तांबे, बाबासाहेब ओहोळ, लहानू भाऊ गुंजाळ, आर.बी.राहणे, इंद्रजीतभाऊ थोरात, बाळासाहेब ढोले, सीताराम राऊत, लक्ष्मणराव कुटे, संतोष हासे, नवनाथ आरगडे, संपतराव गोडगे, रामनाथ कुटे, योगेश भालेराव, लताताई गायकर, निर्मलाताई गुंजाळ, अंकुश ताजने, सरपंच नरेंद्र गुंजाळ, रामनाथ कु-हे, भास्कर शर्माळे आधी उपस्थित होते.

Sugar Factory
Yashwant Sugar Factory Notice: ‘यशवंत’च्या ३०० कोटींच्या जमीन विक्रीप्रकरणी नोटीस

बाळासाहेब थोरात म्हणाले की, सहकारमहर्षी भाऊसाहेब थोरात यांच्या आदर्श तत्त्वावर संगमनेरचा सहकार व कारखान्याचा कारभार सुरू आहे. चांगला कारभार व व्यवस्थापनामुळे सर्व शेतकरी सभासद व जनतेचा कारखान्यावर मोठा विश्वास आहे.विधानसभेच्या पार्श्वभूमीवर कारखान्याच्या निवडणुकीबाबत मोठी चर्चा होती.

मात्र तालुक्यातील जनतेच्या सभासदांचा शेतकरी सहकार जपला पाहिजे ही सर्वांची भावना होती. आपण कायम तालुक्याच्या विकासासाठी काम केले. कधीही भेदभाव केला नाही. मोठ्या संघर्षातून तालुक्याला हक्काचे पाणी मिळवले. सातत्याने विकास कामे केली. निळवंडे धरण व कालव्यांची कामे पूर्ण केली. आज कालव्यांमधून पाणी येते आहे. यामध्ये कष्ट आहेत. जेथे टँकर होते तेथे आज पाणी, असल्याचे ते म्हणाले.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon - Agriculture News
agrowon.esakal.com