Maharashtra Culture : अनगरसह परिसरात पावसाची सर्वच नक्षत्रे कोरडी गेल्याने यंदा खरिपाची पेरणीही अपेक्षित प्रमाणात होऊ शकली नाही. .त्यामुळे शेतकरी चिंतेत असले तरी वर्षभर शेतात राबणाऱ्या ‘सर्जा-राजा’प्रति असलेली कृतज्ञता व बैलपोळ्याचा उत्साह कायम आहे..Bailpola Kalji: बैलपोळा साजरा करताना बैलांची काळजी महत्त्वाची, चुका टाळा .बैलपोळा सणाला अवघे काही दिवस शिल्लक असल्याने येथील आठवडी बाजारात बैलपोळ्यासाठी लागणाऱ्या साहित्याच्या विक्रीसाठी परंडा, बार्शी, मोहोळ, यावली, गावडी, दारफळ आदी ठिकाणांहून विक्रेते दाखल झाले. त्यामुळे बाजार विविध साहित्यांनी गजबजून गेला..बाजारात म्होरकी, बाशिंग, वेसण, कासरा, कंडा, कवडीच्या माळा, घुंगरू माळा, चंगाळी, गोंडे, शिंगे रंगविण्यासाठी सुरक्षित रंग, बेगड, इंगूळ, शिंगांवर बांधण्यासाठी फुगे, बैलांच्या अंगावर लावण्यासाठी तोडे, विविध रंग, पैजण, चवरी आदी साहित्य विक्रीसाठी उपलब्ध आहेत..ॲग्रोवनचे सदस्य व्हाशॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.