Jambhul Rate : बहाडोलीच्या जांभळाला किलोला मिळाला ६०० ते ७०० रुपयांचा दर

Jambhul Market : पालघर तालुक्याच्या पूर्वेकडील वैतरणा नदीकिनारच्या प्रसिद्ध बहाडोली गावची टपोरी जांभळे बाजारात दाखल झाली आहेत.
Jambhul Arrival
Jambhul ArrivalAgrowon
Published on
Updated on

Palghar Market News : पालघर तालुक्याच्या पूर्वेकडील वैतरणा नदीकिनारच्या प्रसिद्ध बहाडोली गावची टपोरी जांभळे बाजारात दाखल झाली आहेत. किलोमागे सहाशे ते सातशे रुपये दराने या जांभळाची विक्री केली जात आहे.

हंगामातील फळ काढणीला एप्रिल महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात सुरुवात झाली आहे. मे महिन्याच्या पहिल्या आठवड्यात जांभळाच्या फळांची आवक वाढल्यानंतर जांभळाचे दर कमी होण्याची शक्यता असल्याची माहिती शेतकऱ्यांनी दिली.

यंदाचा हंगाम एप्रिल महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात सुरू झाल्याने एक ते दीड महिन्यांचा हंगाम मिळणार असल्याने शेतकरी आनंदात आहेत.

शेताच्या बांधावरच्या लावलेल्या जांभळाच्या झाडाला येणारी फळे काढून विकणारे बहाडोली गावातील शेतकरी कृषी विभागाच्या मार्गदर्शनात नवीन वृक्षलागवड, जांभळाचे उत्पादन आणि फळाच्या गुणवत्तेत वाढ करण्यासाठी मेहनत घेत आहेत. एकट्या बहाडोली गावात जांभळाच्या सहा हजार झाडांची लागवड आहे; तर नव्याने दोन हजार झाडांची लागवड केली आहे.

Jambhul Arrival
Jambhul Season : यंदा जांभूळ हंगाम लांबणार

भौगोलिक मानांकनासाठी प्रयत्न

जांभळाच्या झाडाचा इतिहास, जांभूळ फळाचे वैशिष्ट्य, जांभूळ लागवड असलेल्या परिसराचा नकाशा, जांभूळ महोत्सवाच्या आयोजनाबाबतची वर्तमानपत्रांतील कात्रणे, कृषी अधिकारी आणि शास्त्रज्ञांच्या जांभूळ बागेतील भेटींची छायाचित्रे आदी माहिती शेतकऱ्यांनी गटामार्फत एकत्र करून, भौगोलिक मानांकनासाठी आवश्यक माहितीसह प्रस्ताव सादर करण्यासाठी तज्ज्ञ लोकांची नेमणूक करण्याचा प्रस्ताव कृषी विभागाने गावातील शेतकऱ्यांना दिला आहे.

मे महिन्याचा शेवटचा आठवडा ते जून महिन्यात सुरू होणाऱ्या जांभळाच्या फळाचा हंगाम एक महिन्याने कमी करण्यासाठी कृषी विभाग आणि कृषी विद्यापीठाकडून संशोधन सुरू आहे. वयोमान आणि उंची वाढलेल्या झाडांची छाटणी करण्याचा सल्ला कृषी विभागाकडून शेतकऱ्यांना देण्यात आला आहे. नवीन लागवड केलेल्या झाडांची उंचीत होणारी वाढ रोखण्यासाठी छाटणी करून झाडाचा विस्तार जमिनीला समांतर करून फळ तोडणी सोपी होईल; तसेच फळांचा हंगाम मे महिन्याच्या पहिल्या आठवड्यात सुरू होऊ शकतो.
तरुण वैती, तालुका कृषी अधिकारी

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon - Agriculture News
agrowon.esakal.com