Vardha News: सरकार शेतकऱ्यांसाठी काम करत असल्याचा दावा खोटा असून, कापूस आयात आणि बोगस औषधांमुळे शेतकरी आर्थिक संकटात सापडल्याचा आरोप बच्चू कडू यांनी देवळी येथे केला. दिव्यांगांच्या मानधनात केवळ हजार रुपयांची वाढ करून त्यांच्यावर अन्याय होत असल्याचेही त्यांनी नमूद केले. .जोपर्यंत दिव्यांगांचे मानधन सहा हजार रुपये होत नाही, तोपर्यंत लढा सुरू ठेवण्याचा निर्धार त्यांनी व्यक्त केला. देवळी येथील छत्रपती शिवाजी महाराज नाट्यगृहात आयोजित शेतकरी, शेतमजूर आणि दिव्यांगांच्या मेळाव्यात प्रहार जनशक्ती पक्षाचे संस्थापक बच्चू कडू बोलत होते..Bacchu Kadu : आंदोलकाला लाथ मारणाऱ्या पोलिसाची खैर नाही; पंकजा मुंडेंवरही बच्चू कडूंची टीका.शेतकऱ्यांवर अन्यायबच्चू कडू यांनी आपल्या भाषणात सरकारवर शेतकऱ्यांच्या हिताकडे दुर्लक्ष केल्याचा आरोप केला. ते म्हणाले, "सरकार शेतकऱ्यांसाठी काम करत असल्याचा दावा करते, पण हा दावा पूर्णपणे खोटा आहे. सरकार कापूस आयात करून शेतकऱ्यांच्या कापसाचे भाव पाडत आहे. यामुळे शेतकऱ्यांचे मोठे आर्थिक नुकसान होत आहे.".याशिवाय, शेतीसाठी लागणारी औषधे बनवणाऱ्या गुजरातमधील काही कंपन्या बोगस औषधे पुरवत असल्याचा आरोपही त्यांनी केला. या खोट्या औषधांमुळे महाराष्ट्रातील शेतकरी आर्थिक संकटात सापडल्याचे त्यांनी सांगितले..Bacchu Kadu: शेतकरी आत्महत्याप्रश्नी ‘सिंदूर यात्रा’ काढणार : कडू.दिव्यांगांच्या समस्यांकडेही बच्चू कडू यांनी लक्ष वेधले. ते म्हणाले, "खासदार आणि आमदारांचे पगार मोठ्या प्रमाणात वाढतात, पण दिव्यांगांच्या मानधनात केवळ एक हजार रुपयांची वाढ केली जाते. जोपर्यंत दिव्यांगांचे मानधन किमान सहा हजार रुपये होत नाही, तोपर्यंत माझा लढा सुरू राहील.".त्यांनी आतापर्यंत दिव्यांगांच्या हक्कासाठी १८२ शासन निर्णय मिळवले असल्याचे सांगितले. मात्र, तरीही दिव्यांगांचे हाल थांबले नसल्याची खंत त्यांनी व्यक्त केली. ते म्हणाले, "दिव्यांग, शेतकरी आणि शेतमजूर आपल्या मतांचा वापर करतात, पण त्यांच्या बदल्यात त्यांना काहीच मिळत नाही.".ॲग्रोवनचे सदस्य व्हाशॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.