Bachchu Kadu Farmers Protest Announcement: शेतकऱ्यांच्या शेतीमालाला हमीभाव मिळावा, यासाठी नियोजनबद्ध आणि व्यापक लढा उभारण्यात येणार आहे, अशी घोषणा आमदार बच्चू कडू यांनी रविवारी (ता. १२) नागपूर येथे केली. बोगस बियाण्यांमुळे शेतकऱ्यांचे संपूर्ण वर्ष उद्ध्वस्त होत असल्याने अशा कंपन्यांच्या मालकांना जन्मठेपेची शिक्षा करण्याइतकी कठोर कारवाई व्हावी, अशी मागणी त्यांनी केली. .माध्यमांशी संवाद साधताना कडू म्हणाले, ‘‘प्रहार संघटनेने वर्षभर सातत्याने केलेल्या आंदोलनामुळेच सरकारला कर्जमाफीचा निर्णय घ्यावा लागला. चक्काजाम आंदोलनामुळे सरकारवर दबाव निर्माण झाला असून, या प्रश्नावर झालेल्या बैठकीत उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी घेतलेली ठाम भूमिका महत्त्वाची ठरला आहे,’’ असा दावा त्यांनी केला. कर्जमाफीचा निर्णय घेतल्याबद्दल मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री शिंदे यांचे त्यांनी आभारही मानले..Crop MSP: शेतपिकांचा हमीभाव ठरवताना केंद्राकडून उत्पादन खर्च गृहीत धरला जातो का?.शेतकऱ्यांसाठी आता पुढील लढा हमीभावाचा असल्याचे सांगत कडू म्हणाले, ‘‘उत्पादन खर्चाच्या तुलनेत शेतीमालाला न्याय्य दर मिळणे ही काळाची गरज आहे. त्यासाठी राज्यभर नियोजनबद्ध आंदोलन उभारले जाईल. बोगस बियाण्यांमुळे शेतकऱ्यांचे आर्थिक नुकसान तर होतेच, पण संपूर्ण हंगाम वाया जातो. त्यामुळे अशा कंपन्यांविरोधात अत्यंत कठोर कायदेशीर कारवाई होणे आवश्यक आहे.’’.Bacchu Kadu Joins Shiv Sena: बच्चू कडूंचा शिंदेंच्या शिवसेनेत प्रवेश, विधानपरिषदेसाठी उमेदवारी जाहीर.‘एकनाथ शिंदे पुन्हा मुख्यमंत्री होतील’राजकीय घडामोडींवर भाष्य करताना कडू म्हणाले, की राज्यात पुन्हा एकनाथ शिंदे हेच मुख्यमंत्री होतील. फडणवीस यांनी दिल्लीतील नेतृत्वाची जबाबदारी स्वीकारावी. शिंदेंमुळेच भाजपचे सरकार सत्तेत आले असून, त्याबाबत भाजपने परोपकाराची भावना ठेवावी. .संजय राऊत यांच्या वक्तव्यांना कोणतेही महत्त्व नसल्याचा टोलाही त्यांनी लगावला. अमरावती येथील निमंत्रण पत्रिकेच्या वादाबाबत विचारले असता, तो विषय ‘चिल्लर’ स्वरूपाचा असून त्यावर अधिक भाष्य करण्याची आवश्यकता नाही, असेही ते म्हणाले..ॲग्रोवनचे सदस्य व्हाशॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.