Bacchu Kadu News : बच्चू कडू यांच्यासह शेतकरी नेते मुंबईत दाखल; संध्याकाळच्या बैठकीत तोडगा निघणार?
Bacchu Kadu At Mumbai : शेतकरी कर्जमाफीसह विविध मागण्यांसाठी आज (ता.३०) मुख्यमंत्री आणि बच्चू कडू यांची संध्याकाळी सात वाजता सह्याद्री अतिथीगृहावर बैठक आयोजित करण्यात आली आहे. या बैठकीसाठी बच्चू कडूसह अजित नवले, महादेव जानकर, राजू शेट्टी, रविकांत तुपकर, राजन क्षीरसागर आदी शेतकरी नेते दुपारी ३ वाजता मुंबईत पोहचले आहेत.