Achalpur News: माजी आमदार बच्चू कडू यांच्या नेतृत्वाखालील आंदोलकांनी गुरुवारी (ता. ५) मेळघाट संघर्ष महापदयात्रेत जारिदा येथे वनविभागाच्या कार्यालयाला घेराव घातला. कर्जमुक्तीच्या आश्वासनाची सरकारला आठवण करून देण्यासाठी, तसेच मेळघाटातील प्रलंबित प्रश्नांकडे शासनाचे लक्ष वेधण्यासाठी ही पदयात्रा काढण्यात आली आहे..सुमारे २५० किलोमीटरचा प्रवास करणाऱ्या या महापदयात्रेला सेमाडोह येथून प्रारंभ झाला आहे. प्रवासादरम्यान बच्चू कडू विविध आदिवासी गावांना भेट देत असून, स्थानिकांशी संवाद साधून त्यांच्या समस्या प्रत्यक्ष जाणून घेत आहेत. रोजगार, शिक्षण, पिण्याचे पाणी, आरोग्यसेवा, वीज, रस्ते आणि मोबाइल नेटवर्क, अशा मूलभूत सुविधांचा गंभीर प्रश्न मेळघाटात अद्याप कायम असल्याचे त्यांनी या वेळी सांगितले..Bacchu Kadu Protest : बच्चू कडू यांचे 'रेल रोको आंदोलन' रद्द; न्यायालयात लेखी हमीपत्र सादर.Bacchu Kadu Protestया सर्व समस्यांचा अभ्यास केल्यानंतर बहुतेक अडचणी वनविभागाच्या परवानग्यांशी संबंधित असल्याचा आरोप करीत त्यांच्या नेतृत्वाखाली जारिदा येथील वनविभागाच्या कार्यालयाला घेराव घालण्यात आला..Bacchu Kadu Protest : बच्चू कडू यांची मुख्यमंत्र्याशी संध्याकाळी ७ वाजता बैठक; बैठकीला कोण-कोण हजर राहणार? .रस्ते बांधकाम, पाणीपुरवठ्यासाठी पाइपलाइन टाकणे, मोबाईल टॉवर उभारणे आदी विकासकामे वनविभागाच्या नियमांमुळे प्रलंबित असल्याचा आरोप त्यांनी केला. परिणामी, व्याघ्रप्रकल्प क्षेत्रातील गावांमध्ये राहणाऱ्या आदिवासी नागरिकांना मूलभूत हक्कांपासून वंचित राहावे लागत असल्याची खंत त्यांनी व्यक्त केली. केवळ बैठक घेऊन प्रश्न सुटणार नाहीत, ठोस निर्णय झाला नाही तर पुढील काळातही वनविभागाच्या कार्यालयाला घेराव सुरू ठेवण्यात येईल, असा इशारा बच्चू कडू यांनी दिला आहे..घेराव कशासाठी?रंगुबेली व नजीकच्या पाच गावांची पाणीपुरवठा योजना शासनाकडून मंजूर करण्यात आली. मात्र वनविभागाच्या परवानगीअभावी ती रखडली आहे. राणीगाव येथे जलजीवन मिशन अंतर्गत पाणीपुरवठा योजना मंजूर झाली. या कामाकरिता सरकारने तीन कोटी रुपये खर्च केले आहेत. तिचे ९० टक्के काम पूर्ण झाल्यानंतर वनविभागाच्या आडकाठीमुळे ती अपूर्णावस्थेत आहे, असे येथील स्थानिकांनी सांगितले..ॲग्रोवनचे सदस्य व्हाशॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.