Pune APMC
Pune APMC Agrowon

Babhulgaon APMC : बाभूळगाव बाजार समिती सभापतींचा राजीनामा

APMC News : बाजार समितीवर महाविकास आघाडीची एकहाती सत्ता आहे, असे असतानाही पांडे यांनी जिल्हा उपनिबंधक नानासाहेब चव्हाण यांच्याकडे राजीनामा दिल्याने चर्चांना उधाण आले आहे.
Published on

Yavatmal News : कृषी बाजार समितीचे सभापती राजेंद्र पांडे यांनी राजीनामा दिल्याने खळबळ उडाली आहे. बाजार समितीवर महाविकास आघाडीची एकहाती सत्ता आहे, असे असतानाही पांडे यांनी जिल्हा उपनिबंधक नानासाहेब चव्हाण यांच्याकडे राजीनामा दिल्याने चर्चांना उधाण आले आहे.

तालुक्यातील सहकार क्षेत्रात कृषी उत्पन्न बाजार समिती अत्यंत महत्त्वाची आहे. दोन वर्षांपूर्वी झालेल्या बाजार समितीच्या निवडणुकीत महाविकास आघाडीने एकतर्फी विजय मिळविला होता. १८ जागांपैकी १५ जागांवर महाविकास आघाडीचे संचालक निवडणूक आले. केवळ तीन जागा भाजप समर्थित पॅनेलला मिळाल्या.

Pune APMC
Pune APMC : बाजार समितीत बनावट पावत्या; वाहनचालकांना गंडा घालण्याचा प्रकार उघड

सर्वांना सोबत घेऊन चालणारे नेतृत्व म्हणून सभापतिपदी काँग्रेसचे राजेंद्र पांडे यांना विराजमान करण्यात आले. आगामी काळात स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका होऊ घातल्या आहेत. यामुळे तालुक्यात काँग्रेसची पर्यायाने महाविकास आघाडीची ताकद वाढविणे गरजेचे आहे.

Pune APMC
Sindhudurg APMC : सिंधुदुर्गात मार्केट यार्डचा ७० कोटींचा आराखडा

असे असताना काँग्रेस पदाधिकारी राजीनामा देत असल्याने अनेक चर्चांना उधाण आले आहे. नुकत्याच झालेल्या विधानसभा निवडणुकीतही काँग्रेसला पराभवाचा सामना करावा लागला. बाजार समिती सभापतींनी राजीनामा दिल्याने खळबळ उडाली आहे.

राजीनामा देण्यामागे वैयक्तिक कारण सांगितले जात असले तरी कामकाजात आयात स्वपक्षीयांकडून वाढता हस्तक्षेप हेच राजीनामा देण्याचे कारण असल्याची चर्चाही सहकार क्षेत्रात आहे.

मी वैयक्तिक कारणाने राजीनामा दिला आहे. पक्षाने माझ्यावर विश्‍वास दाखविला, मला सभापतिपदाची संधी दिली. त्यामुळे या पदाला न्याय देण्याचे काम केले. यापुढेही पक्ष जी जबाबदारी देईल ती प्रामाणिकपणे पार पाडण्याचा प्रयत्न करील.
- राजेंद्र पांडे, सभापती, कृषी उत्पन्न बाजार समिती, बाभूळगाव

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Agrowon - Agriculture News
agrowon.esakal.com