Azolla Aquatic Plant : मानवी आहारामध्येही करता येईल ॲझोलाचा वापर

Azolla Caroliniana Willd : ॲझोला कॅरोलिनियाना (शा. नाव : Azolla Caroliniana Willd) ही वनस्पती पशुपक्षिखाद्य, हिरवळीचे खत म्हणून जितकी उपयोगी आहे, तितकीच मानवी आहारासाठीही पाचक आणि पोषक घटकांनी परिपूर्ण आहे.
Azolla Caroliniana Willd
Azolla Caroliniana Willd Agrowon

Research on Azolla Caroliniana Willd : आशिया आणि आफ्रिका खंडांतील अनेक देशांमध्ये ॲझोलाच्या काही प्रजाती आढळतात. सध्या त्यांचा वापरही भात पिकामध्ये हिरवळीचे खत, पशुपक्षिखाद्यामध्ये पूरक आहार म्हणून केला जातो. ही वनस्पती स्वतःच्या आवश्यकतेइतके नत्र हवेतून मिळवून दोन दिवसांत स्वतःचे बायोमास दुप्पट करू शकते. ही बाब लक्षात घेऊन ‘जागतिक आपत्तीच्या काळाचा सामना करताना अन्नलवचिकता’ हा आंतरविद्याशाखीय संशोधन प्रकल्प राबविण्यात येत आहे.

हा प्रकल्प मायकेल जॅकोब्सन यांच्या प्रयोगशाळेतील प्रो. डॅनियल विनस्टेड, प्रो. फ्रान्सिस्को डी जिओइया यांच्या नेतृत्त्वाखाली राबविण्यात येत आहे. अॅझोलाविषयी माहिती देताना जॅकोब्सन म्हणाले, की आशिया, आफ्रिका खंडांतील लोक हजारो वर्षांपासून या पाणवनस्पतीचा वापर पशुखाद्य, हिरवळीचे खत म्हणून करत आले आहेत.

त्यात असलेल्या अति उच्च पॉलिफिनोलिक घटकांमुळे तिची माणसांसाठी पचनीयता फारच कमी राहते. त्यामुळे मानवी आहारासाठी आजवर तिचा फारसा विचार करण्यात आलेला नाही. मात्र नव्या अभ्यासातून पुढे आलेली सर्वांत महत्त्वाची बाब म्हणजे अन्य प्रजातीच्या तुलनेमध्ये अॅझोलाची कॅरोलिनियाना या प्रजातीमध्ये हे फिनोलिक घटक खूपच कमी आहेत.

शिजवल्यानंतर ते आणखी कमी होतात. त्यामुळे ही प्रजाती माणसांसाठीही पाचक आणि पोषक घटक पुरवणारी ठरू शकते. त्यामुळे भविष्यातील अन्नसुरक्षेच्या दृष्टीने तिच्या अभ्यासावर लक्ष केंद्रित करण्यात आले आहे.

Azolla Caroliniana Willd
Azolla: धान पिकामध्ये ॲझोलाचा वापर

अतिरिक्त फिनोलिक घटक कमी करण्यासाठी...

मायकेल जॅकोब्सन यांनी सांगितले, की वनस्पतीमध्ये पॉलिफिनोलिक ही नैसर्गिकरीत्या मुबलक प्रमाणात आढळणारी संयुगे आहेत. कमी तीव्रतेमध्ये असल्यास अँटिऑक्सिडेंट म्हणून मानवी आरोग्यासाठी फायदेशीर ठरतात. मात्र त्याची तीव्रता अधिक असल्यास ती शरीरात शोषली जात नाहीत. गॅलिक ॲसिड हे स्थिर फिनॉल असून, त्याचा वापर अन्नातील फिनॉलचे प्रमाण निश्‍चित करण्यासाठी एक मानक म्हणून केला जातो.

या अभ्यासात वापरलेल्या कॅरोलिना ॲझोलाचा पोत कुरकुरीत असून, त्याला स्वतःची अशी फारशी चव नाही. पेन स्टेट युनिव्हर्सिटीमध्ये हरितगृहात त्याची वाढ करण्यात आली. त्या कॅरोलिना ॲझोलामधील फिनॉल संयुगे मोजली असता ती प्रति किलो कोरड्या वजनाच्या साधारणपणे १.४ आणि ६.२ दरम्यान म्हणजेच सरासरी ४.२६ ग्रॅम गॅलिक ॲसिड समतुल्य आढळली.

आशिया आफ्रिकेमध्ये वाढणाऱ्या ॲझोला प्रजातीमध्ये हेच प्रमाण २० ते ६९ ग्रॅम गॅलिक ॲसिड या दरम्यान येते. हे प्रमाण मानवी सहज पचनक्षमतेच्या बाहेर जाते. तुलनेसाठी विनस्टेड यांनी दिलेल्या माहितीनुसार सोयाबीनमध्ये १.२ ते ६.६ पर्यंत; शेंगदाण्यामध्ये ०.५ ते १९ ग्रॅमपर्यंत गॅलिक ॲसिड समतुल्य फिनॉल संयुगे असतात.

संशोधकांनी हे फिनॉलिक घटक कमी करण्यासाठी स्वयंपाक करण्याच्या उकळणे, दाबाखाली शिजवणे (प्रेशर कूकिंग) आणि नैसर्गिक किण्वन या तीन पद्धतीं वापरून पाहिल्या. कच्च्या वनस्पतीच्या तुलनेत या शिजवण्याच्या पद्धतीतून फिनॉलचे एकूण प्रमाण अनुक्रमे ८८ टक्के, ९२ टक्के आणि ६२ टक्क्यांनी कमी झाल्याचे दिसून आले. म्हणजेच त्याची पचनीयता वाढली असून, त्यातील पोषक घटकही शरीरास उपलब्ध होऊ शकतात.

Azolla Caroliniana Willd
Animal Feed : जनावरे, कोंबडीच्या आहारात ॲझोलाचा वापर का आहे महत्त्वाचा?

कॅरोलिना ॲझोलाची उपयुक्तता

कॅरोलिना ॲझोला स्थानिक लोक मोस्किटो फर्न, फेअरी मॉस आणि वॉटर फर्न या नावानेही म्हणून संबोधतात. ही जलद वाढणारी वनस्पती असून, कमीतकमी निविष्ठा, देखभाल आणि प्रक्रियेमध्ये उत्पादन घेता येते.

या प्रजातीमध्ये प्रथिने आणि खनिजांचे प्रमाण मध्यम आहे.

आपत्ती आणि अचानक उद्‍भविणाऱ्या तीव्र परिस्थितीमध्येही कमी जागेमध्ये त्याचे उत्पादन घेणे शक्य असल्याचे विनस्टेड यांनी सांगितले.

हिरवळीचे खत किंवा पशुखाद्य म्हणून आजवर पाहिल्या जाणाऱ्या कॅरोलिना ॲझोला मानवी आहारासाठीही उपयुक्त ठरू शकते.

याचे उत्पादन कमीत कमी जागेमध्ये घेता येत असल्यामुळे अत्यल्प भूधारक शेतकऱ्यांसोबतच अवकाश यात्रांमध्येही उपयोगी ठरू शकते.

...असा आहे अन्न लवचिकता प्रकल्प

‘जागतिक आपत्तीच्या काळाचा सामना करताना अन्नलवचिकता’ या प्रकल्पामध्ये पेन स्टेट युनिव्हर्सिटीचे संशोधक प्रादेशिक, लवचिक, दुष्काळ-प्रतिरोधक अन्न पिके आणि वाढती कृषी जैवविविधता यांचे परीक्षण करत आहेत.

त्यात प्रामुख्याने सामान्यतः माणसांकडून आहारामध्ये अत्यंत कमी वापरल्या जाणाऱ्या व जंगली वनस्पतीवर लक्ष केंद्रित केले आहे. कॅरोलिना ॲझोला ही उत्तर अमेरिकेतील पाणवनस्पतीस असून, अशाच आफ्रिका खंडातील काही वनस्पतींचाही अभ्यास केला जात असल्याचे जॅकोब्सन यांनी सांगितले. ॲझोलाच्या अभ्यासामध्ये फूड सायन्स आणि इंटरनॅशनल ॲग्रिकल्चरमधील पीएच.डी. विद्यार्थी मार्जोरी जौरेगुई यांनीही महत्त्वाचे योगदान दिले.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com