

Congress Vs BJP in Parliament Winter Session: संसदेच्या हिवाळी अधिवेशानाचा शेवट शुक्रवारी (ता.२०) होणार आहे. पण याआधी आजचा दिवस नाट्यमय झाला. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्यावरील गृहमंत्री अमित शाह यांच्या विधानावर वाद काँग्रेस आणि भाजपचे खासदार आमने-सामने आले. यावेळी झालेल्या धक्काबुक्कीप्रकरणी काँग्रेस नेते तथा लोकसभा विरोधी पक्ष नेते राहुल गांधी यांच्या विरोधात भाजपने पोलिसांत फिर्याद दिली आहे. यानंतर त्यांच्यावर 'हत्येचा प्रयत्न' असा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. यामुळे त्यांच्या अडचणीत वाढ झाली असून काँग्रेस आक्रमक झाली आहे.
आज काँग्रेसने पुन्हा एकदा आंबेडकरांच्या अपमानाचा मुद्दा उठवत जोरदार निदर्शने केली. यामुळे सभागृह तहकूब कारावे लागले. यानंतर भाजपाने आंबेडकरांचा अपमान केल्याचा आरोप काँग्रेसवर करत निषेध केला. यामुळे संसदेबाहेर भाजप आणि काँग्रेसचे खासदार आमने-सामने आले. या गदारोळ भाजपचे खासदार प्रताप सारंगी जखमी झाले. सारंगी यांना राम मनोहर लोहिया रुग्णालयात दाखल करण्यात आले.
यानंतर राहुल गांधींनी या आरोपांना फेटाळत भाजपच्या सदस्यांनी त्यांना धक्का केल्याचा दावा केला आहे. तसेच आपण संसदेच्या प्रवेशद्वारातून आत जाण्याचा प्रयत्न करत होतो, मात्र भाजपचे खासदार रोखत होते. ते धमक्या देत होते. त्यामुळे असे झाले. संसदेत आम्हाला जाण्याचा अधिकार आहे. पण मुख्य मुद्दा म्हणजे भाजप संविधानावर आघात करत आहेत असाही आरोप राहुल गांधींनी केला आहे.
यानंतर भाजप खासदार अनुराग ठाकुर यांच्यासह काही भाजप खासदारांनी दिल्ली पोलिसांकडे राहुल गांधींविरुद्ध तक्रार दिली. या तक्रारीवरून १०९, ११५, ११७, १२५, १३१ आणि ३५१ या कलमांतर्गत तक्रार दाखल केली आहे. कलम १०९ हत्येचा प्रयत्न, कलम ११७ इतरांना गंभीर दुखापत पोहोचवणे असे आहेत.
यावरून प्रियंका गांधी वाड्रा यांनी अमित शाह यांचा बचाव करण्यासाठी भाजपने ही खेळी केल्याचा आरोप केला आहे. तर काँग्रेस किंवा राहुल गांधी यांनी धक्काबुक्की केली नाही. तर भाजपच्या खासदारांनी धक्काबुकी केली. त्यांनी दहशत माजवली.
राहुल गांधी यांचा कोणालातरी धक्का लागला. जे माझ्या डोळ्यांसमोर झालं, तुम्ही सगळ्यांनी पाहिलं की कसे खरगे यांनाही धक्का देऊन जमीनवर पाडण्यात आले. आम्ही रोज विरोध करत आहोत, आजपर्यंत काही झालेले नाही. अमित शाह त्यांच्या तोंडातून जय भीमचा नारा देखील पडू शकत नाही, अशी टीका ही प्रियंका गांधी यांनी केली आहे.
दरम्यान नागालँडच्या भाजपच्या महिला खासदार फांगनोन कोन्याक राहुल गांधींवर महिला शोषणा सारखा प्रकार केल्याचा आरोप केला आहे. याबाबत कोन्याक यांनी राज्यसभेचे सभापती जगदीप धनखड यांची बेट घेऊन तक्रार केली आहे. याबाबत त्यांनी सभापतींना पत्रही लिहिले आहे. ज्यात राहुल गांधींनी आपल्याला धक्का देत अपमान केला. ते माझ्या इतक्या जवळ आले होते की आपण अस्वस्थ झालो. यामुळे माझ्या प्रतिष्ठा आणि आत्मसन्मानाला गंभीर ठेच पोहचल्याचे कोन्याक यांनी सांगितले आहे.
विरोधी पक्षनेते राहुल गांधी माझ्या जवळ आले. ते माझ्या खूप जवळ आले आणि त्यांनी ओरडायला सुरवात केली. आज जे काही झाले ते अत्यंत दुर्दैवी आहे, असे होऊ नये. त्यांनी धमक्या दिल्या. याचा मी विरोध करते. याबाबत मी अध्यक्षांकडेही तक्रार केल्याचे कोन्याक यांनी म्हटले आहे.
ॲग्रोवनचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.
ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.