Farmer Issue : यवतमाळ जिल्ह्यातील ४७ हजार बाधित शेतकऱ्यांची अडकली मदत

Farmers Waiting for Help : अवकाळी, मॉन्सून, अतिवृष्टी तसेच पुरामुळे शेतीपिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले होते. यातील ४७ हजार शेतकऱ्यांना अजूनही मदत मिळालेली नाही.
Farmer Help
Farmer Help Agrowon

Yavatmal News : अवकाळी, मॉन्सून, अतिवृष्टी तसेच पुरामुळे शेतीपिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले होते. यातील ४७ हजार शेतकऱ्यांना अजूनही मदत मिळालेली नाही. शेतकऱ्यांनी ई-केवायसी न केल्यामुळे मदत अडकली आहे. आतापर्यंत तीन लाख २४ हजार ७४९ शेतकऱ्यांच्या खात्यात मदत पोहोचली आहे.

Farmer Help
Farmer Help : दोन वेळा बैलजोडी चोरी गेलेल्या शेतकऱ्याला नेटकऱ्यांची मदत

अवकाळी पाऊस, अतिवृष्टी व पुरामुळे झालेल्या शेतीपिकांच्या नुकसानाची मदत बाधित शेतकऱ्यांना तत्काळ मिळावी यासाठी ई-पंचनामा पोर्टल तयार करण्यात आले आहे. जिल्ह्यात गेल्या वर्षी मार्च, एप्रिल, मे २०२३ मध्ये अवकाळी पाऊस झाला. ऑक्टोबर २०२१, सप्टेंबर, ऑक्टोबर २०२२, जून-जुलै २०२३ मध्ये मॉन्सूनचा पाऊस झाला.

जानेवारी २०२४ मध्ये अवकाळी पावसाचा फटका शेतकऱ्यांना बसला. पाऊस तसेच अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांच्या झालेल्या नुकसानीचे पंचनामे करण्यात आले. यादीसाठी ई-पंचनामा पोर्टल तयार करून आतापर्यंत दोन लाख ७५ हजार ७३९ शेतकऱ्यांची यादी उपलोड करण्यात आली आहे. यादीला जिल्हास्तरावरून मान्यता देण्यात आली आहे.

Farmer Help
Crop Damage Help : मदतीचा फार्स

नुकसानग्रस्त तीन लाख २४ हजार ७४९ शेतकऱ्यांच्या खात्यात २२९ कोटी ५८ लाख ९६१ निधी जमा करण्यात आला आहे. मात्र, आधार बंद असणे, ई-केवायसी न करणे, आधार बँक खात्याशी लिंक नसणे, यामुळे ४७ हजार ६७५ शेतकऱ्यांची मदत अडकली आहे. शेतकऱ्यांच्या खात्यात अजूनही निधी पोहोचलेला नाही. नुकसान झाल्यानंतरही शेतकरी मदतीच्या प्रतीक्षेत आहेत. शेतकऱ्यांना मदत मिळावी यासाठी बाधित शेतकऱ्यांनी तत्काळ ई-केवायसी करून घेणे आवश्यक आहे.

सेतू केंद्रातून आधार प्रमाणीकरण करावे

ज्या शेतकऱ्यांचे ई-केवायसी शिल्लक आहे. त्या शेतकऱ्यांनी तालुका कार्यालय, मंडळ अधिकारी, तलाठी, कोतवाल यांचेकडून व्हीके नंबर प्राप्त करून जवळच्या सेतू केंद्रांत जाऊन आधार प्रामाणिकरण, ई-केवायसी करून घ्यावी लागणार आहे. यानंतर बाधित शेतकऱ्यांच्या खात्यात नुकसानाची रक्कम जमा होणार आहे.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com