Nashik News: राज्याचे उपमुख्यमंत्री (स्व.) अजित पवार यांच्या अस्थींचे सोमवारी (ता. २) नाशिकच्या पवित्र रामतीर्थावर विधिपूर्वक विसर्जन करण्यात आले. गोदावरीच्या तीरावर या विधीवेळी उपस्थित नेते, कार्यकर्ते व नागरिकांच्या अश्रूंनी परिसर शोकसागरात बुडाला होता..अजितदादांचा अस्थिकलश मंत्री छगन भुजबळ व माजी खासदार समीर भुजबळ यांनी नाशिकमध्ये आणला. महाकवी कालिदास कलामंदिर येथे हा कलश अंतिम दर्शनासाठी ठेवण्यात आला होता..Ajit Pawar Tribute: ‘प्रशासनाचा वाघ म्हणजे अजितदादा’.‘दादा परत या...’ अशा आर्त भावनांसह हजारो नागरिकांनी शिस्तबद्ध रांगेत उभे राहून आपल्या लाडक्या नेत्याला श्रद्धांजली अर्पण केली. राजकीय मतभेद व पक्षभेद बाजूला ठेवून सर्वच पक्षांचे नेते व कार्यकर्ते शोकमग्न झाले होते..या प्रसंगी अन्न व नागरी पुरवठामंत्री छगन भुजबळ, मंत्री नरहरी झिरवाळ, माजी मंत्री माणिकराव कोकाटे, आमदार पंकज भुजबळ, दिलीप बनकर, हिरामण खोसकर, सरोज आहिरे, माजी खासदार समीर भुजबळ यांच्यासह अनेक लोकप्रतिनिधी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते..अजितदादा म्हणजे कामाचा धडाका आणि शब्दाला वजन देणारे नेतृत्व. नाशिकशी त्यांचे नाते सदैव जिव्हाळ्याचे राहिले. त्यांच्या जाण्याने केवळ एका पक्षाचेच नव्हे, तर सर्वसामान्यांच्या प्रश्नांना वाचा फोडणाऱ्या प्रभावी नेतृत्वाचे छत्र हरपले आहे..ॲग्रोवनचे सदस्य व्हाशॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.