Sugarcane Crop Update : वाढत्या तापमानामुळे जेवळी शिवारातील ऊस करपू लागला

Monsoon Update : लांबत चाललेला मॉन्सून व सततच्या वाढत्या तापमानामुळे भूगर्भातील पाण्याची पातळी झपाट्याने खालावत आहे.
Sugarcane Crop Update
Sugarcane Crop UpdateAgrowon

Dharashiv News : लांबत चाललेला मॉन्सून व सततच्या वाढत्या तापमानामुळे भूगर्भातील पाण्याची पातळी झपाट्याने खालावत आहे. शिवारात बहुतांश विहिरी व कूपनलिकांनी तळ गाठला असून पाण्याचा ताण पडून उसाचे अनेक फड डोळ्यासमोर करपून जात असल्याने शेतकरी हवालदिल झाला आहे.

कृषी अधिकारी कार्यालयाच्या माहितीनुसार, लोहारा तालुक्यात एकूण भौगोलिक क्षेत्र हे ५३ हजार ७९४ हेक्टर असून यात ४८ हजार ९९५ हेक्टर लागवडीच्या क्षेत्रापैकी ४ हजार ४११ हेक्टर क्षेत्रावर उसाची लागवड झाली.

शेतकऱ्यांच्या मते याहीपेक्षा जास्त क्षेत्रावर उसाची लागवड झाली आहे. अनुकूल हवामान परिसरात कारखान्याची उपलब्धता तसेच नगदी व एकदाच पैसे येत असल्याने पूर्वीपासून या परिसरात बागायती पीक म्हणून उसाला प्रथम पसंती आहे.

Sugarcane Crop Update
Sugarcane Crop : पाणी टंचाईमुळे महाराष्ट्र आणि कर्नाटकमधील ऊस उत्पादनावर परिणाम

गेल्या वर्षी सततच्या ओलाव्यामुळे उसाचे एकरी उत्पन्न निम्म्यावर आले होते. तर या वर्षी सततच्या वाढत्या तापमान व मॉन्सून लांबत चालल्याने पाण्याचा ताण पडून ऊस पिकाचे फडे होताना दिसत आहेत. यामुळे यंदाही उत्पादनात घट होण्याची शक्यता आहे.

शेतकऱ्यांनी बागायती किंवा फळ पिकांचे उत्पादन घेत असल्यास पाण्याचा शाश्वत व कार्यक्षम वापर करण्यासाठी सूक्ष्म सिंचन जसे की ठिबक, तुषार सिंचनाचा वापर करावा. तसेच आपत्कालीन स्थितीत पाण्याची साठवण करावी. शेततळे या योजनेचा लाभ घ्यावा.
मिलिंद बिडबाग, तालुका कृषी अधिकारी, लोहारा

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com