Soybean Rate : सोयाबीनची भाववाढ होताच खरेदीदारांचा हमीभावाचा फंडा

Soybean MSP : अडत बाजारात गेल्या काही दिवसांपासून सोयाबीनची आवक कमी होताच भावामध्ये वाढ होण्यास सुरुवात झाली आहे.
Soybean Rate
Soybean RateAgrowon
Published on
Updated on

Latur News : अडत बाजारात गेल्या काही दिवसांपासून सोयाबीनची आवक कमी होताच भावामध्ये वाढ होण्यास सुरुवात झाली आहे. चार हजार दोनशेपर्यंत प्रतिक्विंटल खाली गेलेला भाव आता चार हजार आठशेपर्यंत गेला आहे. येत्या काळात भाव आणखी वाढण्याची शक्यता असल्याचे खरेदीरांनी सोयाबीन खरेदीसाठी नवी शक्कल काढली आहे. यंदा उत्पादित केलेल्या नवीन सोयाबीनची हमीभावाने खरेदी करण्याचे गाजर दाखविण्यास सुरुवात केली आहे.

बाजारात चार हजार आठशे रुपये भाव असताना हमीभावाने म्हणजे चार हजार ८९२ रुपये प्रतिक्विंटल दराने खरेदी करण्याचे जाहीर करून गाजावाजा सुरू केला आहे. दोन वर्षांत सोयाबीनच्या भावात सातत्याने चढ-उतार राहिली. तीन वर्षांपूर्वी सोयाबीनचे भाव दहा हजार रुपये क्विंटलच्या पुढे गेले होते. हाच भाव नंतरच्या हंगामातही मिळेल, या भाबड्या आशेने शेतकऱ्यांनी दोन वर्षांत उत्पादित केलेल्या सोयाबीनची विक्री न करता ते घरी व शेतात गोदामात साठवून ठेवले.

Soybean Rate
Soybean Rate : सोयाबीनला सहा हजारांचा दर द्यावा

भाववाढीच्या आशेत सोयाबीनचे वजन कमी झाले व काही सोयाबीन खराबही झाले. दोन वर्षांनंतर यंदा काढणी सुरू होण्यापूर्वी किंवा पेरणीच्या हंगामात भाव वाढण्याची आशा असताना भाव घसरू लागले. दुसरीकडे पेरणीच्या खर्चाला पैसे नसल्याने शेतकऱ्यांनी नाइलाजाने भाववाढीच्या आशा सोडून देत साठवून ठेवलेल्या सोयाबीनची विक्री करण्यास सुरुवात केली. यामुळे दोन महिन्यांत अडत बाजारात सोयाबीनची मोठी आवक झाली.

Soybean Rate
Soybean Rate : ‘पिवळ्या सोन्या’ला कवडीमोल दर का?

यात भाव वाढण्याऐवजी कमीच होत गेले. चार हजार रुपये क्विंटलपर्यंत भाव खाली गेला. शेतकऱ्यांनी साठवलेले सोयाबीन संपत आले व बाजारात आवक कमी होताच भाव वाढविण्यास सुरुवात झाली. काही दिवसांत चार हजार आठशे रुपयापर्यंत भाव गेला आहे.

येत्या काळात हा भाव आणखी वाढण्याची शक्यता असल्याने शेतकऱ्यांकडील सोयाबीनच्या खरेदीसाठी व्यापारी व खरेदीदारांनी नवे फंडे सुरू केले आहेत. यात काही खरेदीदारांनी हमीभावाने म्हणजे चार हजार ८९२ रुपये क्विंटल दराने खरेदीचे गाजर शेतकऱ्यांना दाखण्यास सुरुवात केली आहे. दरम्यान, बुधवारी (ता. ४) अडत बाजारात चार हजार ८०७ क्विंटल सोयाबीनची आवक होती. सोयाबीनला कमाल चार हजार ७१५, किमान चार हजार ६१४ तर सर्वसाधारण चार हजार ६६० रुपये प्रतिक्विंटल भाव मिळाला.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com