Monsoon Rain Update : जालना, परभणी आणि हिंगोलीत दमदार पाऊस; जायकवाडीने मिटवली मराठवाड्याची चिंता

Jayakwadi Dam : यंदा मॉन्सूनने चांगली सुरूवात केल्याने मराठवाड्यात भीषण बनलेल्या पाणीटंचाईची समस्या मिटली आहे. तर जालना, परभणी आणि हिंगोलीत दमदार पाऊस झाल्याने शेतीच्या कामांना वेग आला आहे.
Monsoon Rain
Monsoon RainAgrowon

Pune News : राज्यातील सर्वच ठिकाणी मॉन्सून पावसाने जोरदार हजेरी लावली आहे. दोन दिवस आधीच पावसाच्या हजेरीमुळे बळीराजा सुखावला आहे. त्यामुळे शेतीच्या कामांना वेग आला आहे. तर राज्यातील काही ठिकाणी मुसळधार पाऊस झाल्याने शेतीसह घरांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे.

जायकवाडीने चिंता मिटवली

छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यासह संपूर्ण मराठवाड्याला पाणीपुरवठा करणाऱ्या जायकवाडी धरणाने पावसाळ्याच्या सुरूवातीलाच पाणीटंचाईची चिंता मिटवली आहे. यंदा धरणाने तळ गाठल्याने मराठवाड्यातील जनतेला भीषण पाणीटंचाईचा सामना करावा लागला. अनेक ठिकाणी टँकरद्वारे पाणीपुरवठा केला जातोय. यादरम्यान जिल्ह्यात गेल्या चार दिवसापासून झालेल्या दमदार पावसामुळे जायकवाडी धरणाच्या पाणीसाठ्यात तब्बल १.५ टक्क्याची वाढ झाली आहे. त्यामुळे मराठवाडाकरांवर लटकणारी पाणीबाणीचे संकंट तूर्तास टळले आहे. तर आता शेतीच्या कामांना वेग आला आहे. सद्यस्थितीला धरणात पाणीसाठा ५.६५ टक्के झाला आहे.

Monsoon Rain
Monsoon Rain : दोन दिवस पावसाचा येलो अलर्ट; माॅन्सूनची वाटचाल गेल्या तीन दिवसांपासून थांबली

जालन्यात दमदार पाऊस

जालना जिल्ह्यात देखील मागील दोन दिवसापासून अनेक भागात दमदार पावसाने हजेरी लावली आहे. या पावसामुळे जिल्ह्यातील जिल्ह्यात खरीप हंगामाच्या ६ लाख १९ हजार हेक्टर क्षेत्रापैकी २ लाख २९ हजार ९३९ हेक्टर वरील पेरण्या पूर्ण झाल्या आहेत. त्यामुळे बळीराजा सुखावला असून काही भागात आणखी दमदार पाऊस होण्याची आवश्यकता आहे. यानंतर उर्वरीत क्षेत्रावरील पेरण्याही पार पडतील.

परभणीच्या जिंतूर तालुक्याला झोडपले

परभणीच्या जिंतूर तालुक्यातील देवसडी परिसरात शनिवारी (ता.१५) दुपारी जोरदार पाऊस झाला. त्यामुळे नाल्याचे पाणी शेतात घुसले. त्यामुळे येथे २० एकरवरील शेतीचे नुकसान झाले आहे. तर शेतकऱ्यांकडून नुकसान भरपाईची मागणी करण्यात आली आहे.

हिंगोलीत ढगफूटीसदृश्य पाऊस

हिंगोली जिल्ह्यात देखील काही भागात ढगफूटीसदृश्य पाऊस झाल्याने ओढ्यानाल्यांना पूर आला. त्यामुळे काही काळ वाहतूक ठप्प झाली होती. औंढा नागनाथ तालुक्यातील रामेश्वर भागात शनिवारी (ता.१५) दुपारी चारच्या दरम्यान ढगफुटी सदृश्य पाऊस झाला. यामुळे येथील ओढ्या नाल्यांना पूर आला. तर रामेश्वर या गावात औंढा जिंतूर जाणाऱ्या रोडवर पुलाचे काम पुरामुळे बंद पडले. तसेच पुलाच्या कामासाठी टाकलेली मुरूम देखील पावसाच्या पाण्यामुळे वाहून गेला. त्याचबरोबर गजाळी, सेंट्रींग व इतर साहित्य देखील या पुरामध्ये वाहून गेल्याने कंपनीचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे.

Monsoon Rain
Pre Monsoon Rain : मॉन्सूनपूर्व पावसात सहा जणांचा बळी

हवामान विभागाचा इशारा

दरम्यान मुंबई-पुण्यासह अनेक शहरांना मुसळधार पावसाचा इशारा हवामानशास्त्र विभागाने दिला आहे. यावेळी काही जिल्ह्यांना पावसाचा येलो अलर्टही जारी करण्यात आला आहे. तर विजांच्या कडकडाटासह वादळी वारे वाहतील असा अंदाज विभागाने वर्तवला आहे.

धाराशिवमध्ये शेतकरी वंचित

दरम्यान धाराशिव जिल्ह्यातील लोहारा, वाशी आणि धाराशिव या तीन तालुक्यातील शेतकरी दुष्काळी अनुदानापासून वंचित असल्याचे उघड झाले आहे. या तीन तालुक्यातील तब्बल ४१ हजार शेतकऱ्यांना अद्याप दुष्काळी अनुदान मिळालेले नाही. त्यामुळे शेतकऱ्यांमध्ये नाराजीचा सूर आहे.

राज्यात यंदा मोठ्या प्रमाणात दुष्काळी स्थिती निर्माण झाल्याने ३१ ऑक्टोबर रोजी राज्य शासनाने ४० तालुक्यांमध्ये गंभीर, मध्यम स्वरूपाचा दुष्काळ जाहीर करून विविध प्रकारच्या सवलती जाहीर केल्या होत्या. यामध्ये धाराशिव जिल्ह्यातील लोहारा, वाशी आणि धाराशिव या तीन तालुक्यांचा देखील समावेश आहे. यामध्ये १ लाख ५४ हजार २५९ शेतकऱ्यांना २०८ कोटी ५० लाख अनुदान मंजूर झाले. मात्र यातील ४१ हजार शेतकरी केवायसी करूनदेखील अनुदानापासून वंचित आहेत. त्यामुळे हे अनुदान तातडीने द्यावे, अशी मागणी शेतकऱ्यांतून केली जात आहे.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com